कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मिळाली राज्य शासनाची इतकी मदत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानी साठी राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी पूरबाधित नागरिकांना आगाऊ मदत देण्यासाठी प्राप्त झाला आहे. तसेच लवकरच प्राप्त होणारा निधी टप्प्या-टप्प्याने बाधितांना वितरीत करण्यात येणार आहे.