कसबा सांगाव : कसबा सांगाव ( ता.कागल ) येथील विद्यमान उपसरपंच विक्रमसिंह जाधव व सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंच रणजित कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले. कसबा सांगाव ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार करत आपला अधिकार डावलल्याची भावना व्यक्त करत सदस्यांनीही राजीनामे सादर केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.पी कांबळे उपस्थित होते.
Advertisements
सकाळी दहाच्या सुमारास चावडी चौकात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. चार वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी एकत्रित आघाडी करत निवडणूक जिंकली होती.
Advertisements

ग्रामपंचायतीमध्ये सतरा सदस्य असून मुश्रीफ गटाचे लोकनियुक्त सरपंच रणजित कांबळे आहेत.