लेखापरिक्षित वार्षिक हिशेबपत्रके 25 जुलै पर्यंत ऑनलाईन दाखल करा – धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर

कोल्हापूर, दि. 18 : ज्या सार्वजनिक न्यासांनी अद्यापपर्यंत मागील प्रलंबित व दि. 31 मार्च 2021 पर्यंतच्या त्यांच्या अद्यावत वार्षिक हिशोबपत्रकांचे लेखापरीक्षण केलेले नाही, त्यांनी ते तात्काळ करुन घ्यावे व लेखापरिक्षित वार्षिक हिशेबपत्रके कोणत्याही परिस्थितीत दि. 25 जुलै पर्यंत संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन दाखल करावेत, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी केले आहे. … Read more

विमानतळ विस्तारीकरणासाठी मौजे तामगांव जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया सुरु कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाठी मूल्यांकन निश्चिती झाल्यानंतर आज मौजे तामगांव( ता.करवीर) येथील गट नं. ९४१/ज या जमिनीतील क्षेत्र ०.२८.७५ हे. आर या जमीनीचे खरेदीखत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व संबंधित जमिनीचे मालक यांच्या दरम्यान दुय्यम निबंधक करवीर क्र. २ येथे … Read more

जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार मंडलिक यांनी शिंदे गटात सहभागी व्हावे

हमीदवाडा येथिल मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात निर्णय मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही भूमिका हमिदवाडा कारखाना येथे झालेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत एक मुखाने घेण्यात आला. मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या … Read more

व्हनाळी येथे डोळे तपासणी शिबीर अनंतशांती संस्थेचा उपक्रम

व्हनाळी (वार्ताहर) : आनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य व व्हीजनस्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने व्हनाळी ता.कागल येथे मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले. सरपंच सौ.छाया सुतार,उपसरपंच कस्तुरी निचिते यांच्या हस्ते शिबिराची सुरुवात करण्यात आली. शिबिरामध्ये २०० लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या व त्यातील 135 नागरिकांना संस्थेच्या माध्यमातून अवघ्या साठ रुपयात त्याच दिवशी चष्मे वाटप … Read more

मुरगूडच्या ” लक्ष्मीनारायण ” च्या तज्ञ संचालकपदी जगदीश देशपांडे व भारती कामत यांची निवड

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्सवी व प्रचक्रोशित नावाजलेली श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२२ते २०२७ या सालाकरीता संस्थेच्या तज्ञ संचालकपदी श्री जगदीश भास्कर देशपांडे ( सी.ए. कोल्हापूर ) व श्रीमती भारती विनायक कामत ( मुरगूड ) यांची श्री लक्ष्मीनारायणच्या मुख्य शाखेत एकमताने निवड झाली. या निवडीच्यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे … Read more

सुप्रीम कोर्टाच्या दिलासामुळे राज्यात केवळ ‘ईडी’ सरकार – हेमंत पाटील

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तांतर नाटकाचा पहिला अध्याय संपला आहे.पहिल्या अंका नंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. पंरतु, बंडखोर शिवसेना गट आणि मुळ शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत तुर्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे पारडे जड झाल्याने एकनाथ – देवेंद्र यांचे ‘ईडी’ सरकार टिकेल, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत … Read more

गुजरात दंगलीचे पाप झाकण्यासाठीच स्व. अहमद पटेलांवर भाजपाकडून गलिच्छ आरोप ! : नाना पटोले

मुंबई (दि. १६ जुलै २०२२) : काँग्रेस नेते स्व. अहमद पटेल यांच्यावर भाजपाने केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. २००२ च्या गुजरात दंगलीने नरेंद्र मोदींची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. गुजरात दंगलीवेळी राजधर्माचे पालन केले नाही म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होते. गुजरात दंगलीचे हे पाप झाकण्यासाठीच काँग्रेसवर … Read more

एका महिलेने दिला तिळ्यांना जन्म

सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये झाली प्रसूती कागल/प्रतिनिधी : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील महिलेने कागल शहरातील सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यात तिळ्यांना जन्म दिला. या मातेची गुंतागुतीची वैद्यकीय प्रसुती तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. तिळ्यासह मातेची तब्येत ठीक आहे. यावेळी तिला दोन मुली व एक मुलगा ही अपत्ये झाली आहेत. तिन्ही बाळाची … Read more

स्वराज्य रक्षक स्वामीनिष्ठ वीर शिवाजी काशीद म्हणजे इतिहासातील त्यागाचे पान होय – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

मुरगूड (शशी दरेकर) – शिवरायां प्रति स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यासाठी प्राणत्याग याचे मुर्तीमंत उदाहरण नरवीर स्वराज्यरक्षक शिवाजी काशीद होय असे उद्‌गार वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी काढले ते मुरगूड येथे नाभिक समाज बांधवांच्या वतिने आयोजित वीर शिवाजी काशीद यांच्या ३६१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. दिग्वीजयसिंह पाटील (मुरगूडकर) हे होते. संजय रणवरे … Read more

कामधेनु पतसंस्थेच्या चेअरमनपदी के. बी. वाडकर तर व्हा. चेअरमनपदी सुर्यकांत मर्दाने

व्हनाळी (वार्ताहर) : व्हनाळी ता. कागल येथील श्री कामधेनू ग्रामीण बिगर शेतीसह पतसंस्थेच्या चेअरमनपदी के.बी‌.वाडकर यांची तर व्हा.चेअरमनपदी सुर्यकांत रामचंद्र मर्दाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. एन. बंडगर यांनी काम पाहिले. यावेळी संचालक एम. टी पोवार, जयसिंग हात्रोटे, रंगराव पाटील, हिंदुराव पाटील, रंगराव दंडवते, बाबुराव पोवार, आनंदी वाडकर, गिता जाधव … Read more

error: Content is protected !!