मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात लोकनेते स्व . सदाशिवरावजी मंडलिक साहेब यांची ८८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम संघाचे संचालक श्री. जयवंत हावळ यानीं उपस्थितांचे स्वागत केले. संघाचे उपाध्यक्ष श्री. पी. डी. मगदूम यानी प्रास्ताविक केले.
संघाचे संचालक व साहित्यीक श्री. पांडूरंग पाटील यानीं मंडलिक साहेबाच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केला. उपस्थितानीं साहेबांच्या स्मृतिस अभिवादन करून ” मंडलिक साहेब ” अमर रहे अशा घोषणानी संपूर्ण परिसर दुमदूमून गेला.
संघाचे अध्यक्ष श्री. गजाजनराव गंगापूरे यानी स्व. मंडलिक साहेबांच्या विषयीच्या अनेक आठवणींचा उहापोह केला. या कार्यक्रमास संघाचे संचालक, सदस्य, तसेच स्व. मंडलिकसाहेबांचे जुने निष्ठावंत सहकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संचालक श्री. एम्. टी. सामंत यानीं सर्वांचे आभार मानले.