कच्चे विषय पक्के करणारे विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात : अनिल अस्वले

मुरगूडच्या लिटल मास्टर गुरूकुल गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम पार

मुरगूड (शशी दरेकर) : विषयात कच्चे असणारे विद्यार्थी आयुष्याच्या वाटचालीत गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे पक्क्या मार्गावर मार्गक्रमण करून जीवनात यशस्वी होतात असे मत एन एस एस सी चे विभाग प्रमुख अनिल अस्वले यांनी व्यक्त केले.

Advertisements

       येथील लिटल मास्टर गुरुकुलम शाळेतील गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते.  मुख्याध्यापिका सौ. सुमन अनावकर अध्यक्षस्थानी होत्या.

Advertisements

        अस्वले म्हणाले, मुलांना संस्कार शिक्षक, आई-वडील यांच्याकडूनच मिळतात. या बळावरच मुलानी स्वप्रयत्न, जिद्द आणि चिकाटीची कास धरून जीवनात यशस्वी व्हावे.

        यावेळी आई-वडिलांचे व गुरुजनांचे चरणस्पर्श तसेच करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जय महाराष्ट्र हायस्कुलचे मुख्याध्यापक मारुती पारळे मुख्याध्यापिका सुमन अनावकर यांनी मनोगत व्यक्त केले.

Advertisements

          यावेळी दिपाली कांबळे, प्रदीप  सोरप, सुभाष आनावकर, बुजरे सर, सौ. यरणाळकर, शंकर प्रजापत आदी उपस्थित होते.

      स्वागत व प्रास्ताविक  मुख्याध्यापिका सुमन आणावकर तर सूत्रसंचालन अलका गायकवाड यांनी केले. सेजल पाटील यांनी आभार मानले. मनीषा पाटील, ज्योती डवरी, रूपाली सुतार, प्रियंका पाटील, नंदा मुसळे, संचली साळोखे, दिपाली कदम, रश्मी सावंत, माधुरी सावर्डेकर, पुनम तापेकर, आश्विनी अनावकर,  सुरेश सुतार इ. नी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

Leave a Comment

error: Content is protected !!