मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व्होकेशनलचे माजी विभागप्रमुख प्रा.एस.एन.अंगज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार सर हे होते … Read more

लघु व मध्यमवर्गीय वृत्तपत्रांचा छळ थांबवावा – केशवदत्त चांडोला

वेरावळ (सोमनाथ) : लघु व मध्यमवर्गीय वृत्तपत्रांची छळवणूक थांबविण्याची मागणी केली.जाहिरात धोरणातील त्रुटी दूर करण्याची मागणी आर. एन. आय. आणि सी. बी. सी. च्या कार्यशैलीवर वेरावळ (सोमनाथ), गुजरातमध्ये टीका करण्यात आली. भारतीय लघु आणि मध्यम वृत्तपत्रांच्या असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक माहेश्वरी भवनाजवळ असलेल्या टी.एफ. येथे झाली. सी. सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. दीपप्रज्वलन करून सभेचे … Read more

बिद्रीत पुन्हा के. पी. च ‘ लय भारी ‘ ! विरोधकांचा धुव्वा ; सर्वच्या सर्व २५ जागांवर विजय

मुरगूडमध्ये सत्तारूढ गटाचे प्रविणसिंह पाटील यांचे जल्लोशी स्वागत मुरगूड ( शशी दरेकर ) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने २५ पैकी २५ जागा जिंकत … Read more

कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरती

कोल्हापूर (जिमाका) :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन करिता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरण्यात येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज दि. 8 ‍डिसेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) राहुल माने यांनी केले आहे.  अशासकीय पहारेकरी हे … Read more

दिव्यांग व्यक्तींकडे UDID कार्ड नसेल तर ८१०७०४०२०२ या क्रमांकावर संपर्क करा  –  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. 2 : जिल्हयातील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही दिव्यांग पुरुष व महिलांकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र अथवा त्यांच्यासाठी खासकरुन शासनाकडून देण्यात येणारे UDID (यू.डी.आय.डी.) कार्ड जर नसेल तर  अशा व्यक्तींचे नाव, त्याचा फोन नं. आणि कोणत्या गावात अथवा शहरात राहतो, त्या गाव शहराचे नाव ८१०७०४०२०२ या क्रमांकावर Whatsapp/SMS व्दारे पाठवावे किंवा संबंधीत दिव्यांग व्यक्तीला वरील नंबरवर … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १२ ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक १२ दिनांक ४-१२-२०२३ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

सांगाव येथील विवाहित महिलेची आत्महत्या नसून घातपात

कागल पोलिसात भावाची तक्रार कागल / प्रतिनिधी – कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे विवाहित महिलेने केलेली आत्महत्या नसून तो घातपात आहे. अशी तक्रार आत्महत्या केलेल्या महिलेच्या भावाने कागल पोलीस ठाण्यात दिलेली आहे. याप्रकरणी मयत महिलेचे पती, सासू ,सासरे यांना कागल पोलिसांनी अटक केलेली आहे. तस्लीमा सोहेल मुल्ला वय वर्षे 25 राहणार कसबा सांगाव, तालुका -कागल … Read more

राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे खड्डे कधी मुजणार

कागल जवळ अपघातग्रस्त खड्डेच खड्डे कागल / प्रतिनिधी : कागल शहरानजीक राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे व लांबलचक चर पडल्याने वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागते आहे. खड्ड्यात दुचाकी व चार चाकी वाहने अडकून नुकसान होत आहे. शिवाय अपघात होऊन काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे खड्डेमय झालेला महामार्ग कधी सुधारणार अशी चर्चा वाहनधारकातून होत आहे. पुणा-बेंगलोर राष्ट्रीय … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कॉन्स्टेबल जीडी पदाच्या २६,१४६ जागा

पद : कॉन्स्टेबल जीडी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एसएसएफ, आसाम रायफल्स मध्ये रायफलमन परीक्षा २०२४ पदसंख्या : एकूण २६,१४६ जागा वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे शैक्षणिक पात्रता : दहावी, शारीरिक अर्हता, इ. वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २३ वर्ष परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/- परीक्षा … Read more

MPSC 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका):   लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, यासाठी अंदाजित वेळापत्रक आयोगाचे उप सचिव दे. वि. तावडे यांनी दिले आहे.

error: Content is protected !!