बातमी

मुरगूड – कोल्हापूर मार्गावर आता नव्या बसेस धावणार

नवीन बसच्या पूजनानंतर कोल्हापूरकडे बस मार्गस्थ

मुरगूड ( शशी दरेकर ) : नुकत्याच गारगोटी आगाराला २० नव्या कोऱ्या बसेस प्राप्त झाल्या आहेत . त्यापैकी मुरगूड – कोल्हापूर साठी दोन नवीन बसेस शनिवार १५ जुलै पासून सुरु करण्यात आल्या. मा. श्री. बळीराम सातवेकर यांच्या शुभहस्ते या नवीन बसचे पुष्पहार घालून पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला. चालक – वाहकानां फेटे बांधून व बुके देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला.

याप्रसंगी मुरगूड बाजारपेठेतील प्रसिद्ध कापड व्यापारी श्री . प्रशांत शहा म्हणाले मुरगूड – पूणे ही बस सांयकाळी येतानां मुरगूडला न येता ती परस्पर गारगोटीला जाते . ती मुरगूडला यावी अशी मागणी त्यानीं यावेळी केली. तसेच कोल्हापूर – मुरगूड रात्री दहा वाजताची ” रातराणी ” बस सुरू करण्यासाठी आगारप्रमुख श्री. नकाते व अभिजीत भोसले ( मुंबई ) यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली.

आता नवीन बसेस अशा सुटतील. मुरगूडहून कोल्हापूरकडे सकाळी ६-१० , ७-२०, ९-३० , १०-४० वाजता . दुपारी २-००, ३-१५ वाजता व सायंकाळी ५-३०, ६-४५, वाजता तसेच कोल्हापूरहून मुरगूडकडे सकाळी ७-५०, ९-००, वाजता, दुपारी ३-४५, ५-०० वाजता तर संध्याकाळी ७-१५ , ८-०० वाजता.

या नवीन गाडीच्या पूजनप्रसंगी श्री . प्रशांत शहा , किशोर पोतदार , एकनाथ खराडे , लोहार ( सर ) , सागर चौगले , कंट्रोलर राजू जठार , शशिकांत लिमकर , दिलीप घाटगे , यांच्यासह असंख्य प्रवासी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *