बातमी

शेती औषधे दुकानचा पत्रा उचकटून केली चोरट्याने चोरी

कागल (विक्रांत कोरे) : येथील शेती बि-बियाणे व औषधे असलेल्या बंद दुकानाचे शटर उचकटून सुमारे दीड लाख रुपये किमतीची चोरी झाली आहे. रोख रकमेसह शेतीसाठी लागणारी औषधे चोरून नेऊन अज्ञात चोरट्याने पोबारा केला आहे. चोरीची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.

कागल येथे माळ भागावर रेणुका ट्रेडर्स शेती सेवा केंद्र या नावाने शेतीसाठी लागणारे औषधाचे दुकान आहे. धैर्यशील आनंदा पाटील राहणार मौजे सांगाव, तालुका कागल, असे दुकान मालकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकडून आत प्रवेश केला.

दुकानातील रोख रुपये 31 हजार 390 तसेच 1700 रुपये किमतीचे तणनाशक, 18628 रुपये किमतीचे कीटकनाशक, ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, ५ हजार रुपये किमतीचे डीव्हीआर चोरून नेऊन चोरट्याने पोबारा केला आहे. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *