कागल /प्रतिनिधी : कागल येथे एका तरुणाने झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमकं कारण समजू शकले नाही. कागल पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
कागल येथील निपाणीवेस आंबेडकर नगर येथे राहणारा तरुणअभिजीत बाळासो कांबळे वय ३४ यांनी कागल लिंगनूर दुमाला रस्त्यावरील कागल हद्दीतील झाडाला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. आत्महत्याचे कारण स्पष्ट झाले नाही. अधिक तपास कागल पोलीस करीत आहेत.
अभिजीत हा कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील इंडो काउंट कंपनीत कामाला होता .त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांच्या मित्र परिवाराने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. त्यांला अडीच वर्षाची मुलगी असून पत्नी आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.