बातमी

विद्यार्थ्यां मधील वैज्ञानिक दृष्टिकोसाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज – गटशिक्षणाधिकारी डॉ जी बी कमळकर

मळगे बुद्रुक येथे कागल तालुका मुख्याध्यापकांची बैठक

मुरगूड (शशी दरेकर) : विद्यार्थ्यांच्या सर्जनशील वृत्तीतून संशोधक निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रदर्शने अत्यंत महत्त्वाची आहेत.वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी शाळा पातळीवरील विज्ञान प्रदर्शने अत्यंत महत्त्वाची ठरतात. या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली उपकरणे व संशोधकवृती याचे प्रदर्शन करणारे एक व्यासपीठ उपलब्ध होईल असे प्रतिपादन कागल गटशिक्षणाधिकारी डॉ . जी बी कमळकर यांनी केले.

मळगे विद्यालय मळगे येथे आयोजित कागल तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. मळगे विद्यालय मळगे बु येथे दि .६ सप्टेंबर रोजी ४८ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

बैठकीमध्ये संचमान्यता विज्ञान प्रदर्शन आधार अपडेशन पोर्टल वरील टॅब भरणे व निपुण भारत या विषयावरील मुद्द्यांवर डॉ. कमळकर यांनी मार्गदर्शन केले .
स्वागत मुख्याध्यापक ए.एम. पाटील यांनी केले विस्तार अधिकारी गावडे पी. डी माने.पी व्ही पाटील.अनिल खामकर, राजश्री पाटील.राम कोंडेकर उपस्थित होते आभार मुख्याध्यापिका प्रभावती पाटील यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *