बातमी

मुरगूडच्या शिवाजी विद्या मंदिर शाळा नंबर 2 व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निशांत जाधव (फौजी ) तर उपाध्यक्षपदी आश्वीनी गुरव यांची निवड

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील शिवाजी विद्या मंदिर च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी : निशांत जाधव यांची तर उपाध्यक्षपदी सौ.आश्वीनी सचिन गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष श्री जीवन भोसले होते .तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक प्रविण आ़ंगज ,आनिल बोटे होते. यावेळी इतर सदस्य श्री विजय मेंडके, अमर चौगुले (छोटू) ,रणजित डोंगळे, विशाल रामशे,सौ जयश्री मोरबाळे ,सौ सुनिता संजय उपलाने,सौ रेणू राजकिरण सातवेकर सौ. संगीता कांबळे, तर शिक्षण तज्ञ जीवनराव कटके, तर सचिव पदी प्रविण आंगज. यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी राजू चव्हाण,संदिप सांरग, के डी. मेंडके,मलगोंडा पाटील, सविता धबधबे आदी उपस्थित होते. स्वागत अनिल बोटे तर प्रास्ताविक प्रविण आंगज सर यांनी केले तर आभार मंकरंद कोळी सर यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *