ताज्या घडामोडी

जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुसानिमित्त कबनूर परिसरातील वाहतुक मार्गात बदल

कोल्हापूर दि. 13 : कबनूर, ता. हातकणंगले येथील जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुस दि. १५ ते २२ मार्च २०२३ या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. या कालावधीत वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी व वाहनांना सुरक्षित पार्किंग उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोटकलम (१) (ब) अन्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दर्गा उरुस काळात कबनूर व परिसरातील वाहतुक मार्गात बदल केला आहे.

वाहतुकीसाठी बंद व चालु केलेले मार्ग खालील प्रमाणे-

कोल्हापूर कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी कबनूर ओढा ते शाहू पुतळा आणि शाहू पुतळा ते कबनूर सर्व प्रकारच्या वाहनाना बंदी घालण्यात आली आहे.

कोल्हापूर कडून येणारी थांबे घेणारी एसटी बस कबनूर ओढा केटकाळे बोरवेल मार्गे पंचगंगा कारखाना, नवीन नगरपालिका चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते एसटी स्टॅण्ड असे राहील तसेच परत इचलकरंजी एसटी स्टॅण्ड हून कोल्हापूरला जाणारी त्याच मार्गाने परत जाईल.

कोल्हापूर कडून येणारी सर्व अवजड वाहने तसेच विना थांबा कोल्हापूर-इचलकरंजी एसटी बस अतिग्रे फाटा हातकणंगले मार्गे इचलकरंजी कडे येतील तसेच इचलकरंजीहून कोल्हापूर कडे जाणारी अवजड वाहने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आंबेडकर पुतळा, नवीन नगरपालिका चौक, पंचगंगा कारखाना, कोरोची हातकणंगले मार्गाने कोल्हापूरला जातील.

कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणारी हलकी वाहने कबनूर ओढा केटकाळे बोरवेल मार्गे पंचगंगा कारखाना, नवीन नगरपालिका चौक असे येतील.

नदी वेश नाका इचलकरंजी कडून कोल्हापूरकडे जाणारी हलकी वाहने उत्तर प्रकाश टॉकीज संभाजी चौक, शाहू पुतळा, नवीन नगरपालिका चौक, पंचगंगा कारखाना, कबनूर ओढा मार्गे कोल्हापूरला जातील.

इचलकरंजीहून चंदूरकडे जाणारी एसटी बस व इतर वाहने शाहूपुतळा, तीनबत्ती चौक, सुर्वे नगर, शाहूनगर, चंदूरला जाईल व त्याच मार्गाने परत येतील.

कबनूर हददीतील पार्किंग व्यवस्था-

इचलकरंजी शहरातून शाहू पुतळा मार्गे जाणारी दुचाकी, चारचाकी वाहने कोल्हापूर नाका जवळील यशोलक्ष्मी मंगल कार्यालय बाजूचे मैदान व रोड कडेला.

कोरोची, शहापूर कडून येणारी दुचाकी व चारचाकी वाहने पंचगंगा कारखाना दक्षिण बाजूचा गाडी अड्डा मैदान.

कोल्हापूर कडून येणारी रुई, साजणी, तिळवणी कडून येणाऱ्या वाहनांना कबनूर ओढा पुलाजवळील मोकळे शेत जमीन या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली असून भाविकांनी इतर कोणत्याही ठिकाणी तसेच मुख्य रस्त्यावर पार्किंग करु नये.

हे निर्देश दिनांक 15 मार्च 2023 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून दिनांक 22 मार्च 2023 रोजी 24 वाजेपर्यंत अंमलात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *