बातमी

अन्नपूर्णा कडून ऑक्टोबर अखेर ऊसबिले जमा – संजयबाबा घाटगे यांची माहिती ; ऊसतोड वाहतूक यांचा समावेश ; साडेपाच कोटी अदा

साके (सागर लोहार): केनवडे (ता.कागल)येथील केमिकल विरहीत (गुळपावडर निर्मीती) करणा॒ऱ्या श्री अन्नपूर्णा शुगर अँड जँगरी वर्क्स लिमिटेड या कारखान्याकडे आँक्टोबर अखेर ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची ऊसबिलांसह ऊस तोडणी, वाहतूकदार यांचीही बिले त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहेत.अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष संजयबाबा घाटगे यांनी दिली.

यापुढेही शेतकऱ्यांसह वाहतूकदारांची बिले वेळेत जमा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. केनवडे येथिल कारखाना कार्यस्थळावर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते. कारखान्याकडे १६ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत पुरवठा झालेल्या एकूण १५ हजार ४२६ टन ऊस बिलांची एकरकमी प्रति टनास 2903 प्रमाणे ४ कोटी ३६ लाख होतात.तर ऊस तोडणी वाहतूकदारांची१ कोटी ३ लाख रक्कम होते. ही सर्व ५ कोटी ३९ लाख बीलाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याचेही अध्यक्ष घाटगे यांनी सांगितले.

विश्वास दृढ …..
श्री अन्नपूर्णा शुगरने १५आँक्टोबर पर्यंतचे ऊस बिल सर्वप्रथम जमा केले होते. तर आँक्टोबर अखेरचेही ऊसबिलेही वेळेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत.कारखाना व्यवस्थापनाने पारदर्शी कारभाराने शेतकऱ्यांचा विश्वास अधिकच दृढ केला आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *