बातमी

मुरगूड जेष्ठ नागरिक संघात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात संघाच्या १६० व्या वाचनकट्टा उपक्रमाच्या अंतर्गत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ .ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री . गजानन गंगापूरे हे होते.

प्रथम डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन संघाचे सदस्य प्रा. चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करून सर्वानी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. सदस्य प्रदिप वर्णे यानीं स्वागत व प्रास्ताविक केले.

डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याविषयी प्रा. किशोरकुमार पाटील, प्रा. चंद्रकांत जाधव , पांडूरंग पाटील , शिवप्रसाद बोरगांवे, जयवंत हावळयानीं त्यांचे विचार मांडून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

अध्यक्षीय भाषणात श्री. गजानन गंगापूरे यानीं डॉ .कलाम हे थोर देशभक्त, सच्चा ज्ञानोपासक , थोर वैज्ञानिक, शांत- निगर्वी स्वच्छ मनाचा व चारित्र्याचे उत्साही व्यक्तीमत्व होते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्राचार्य श्री. पी. डी. माने यानीं केले. कार्यक्रमास संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर, संचालक, सदस्य व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *