ब्रह्माकुमारीज् कागल परिवारा कडून बळीराजाचा सत्कार
कागल(विक्रांत कोरे) :
शेतकरी (farmer) हा जगाचा पालनकर्ता, पोशिंदा बांधव म्हणून काम करीत आहेत, केवळ अन्नदाता म्हणूनच नव्हे तर एकूणच आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांच्या सेवाकामाप्रती सन्मान आणि कृतार्थ भाव व्यक्त करण्यासाठी ब्रह्माकुमारीज् ग्रामविकास प्रभागातर्फे संपूर्ण देशात किसान सन्मान दिवस साजरा करण्यात आला.असल्याचे प्रतिपादन कृषी मार्गदर्शक, आनंदभाई(माऊंट अबू) यांनी केले.
कागल येथील ब्रह्माकुमारीज् स्थानिक सेवाकेंद्रात या निमित्ताने शेतकरी ( farmer ) सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगाचा अन्नदाताच नव्हे तर एकदरीत देशाच्या सर्वांगिण विकासाचा कणा असणा-या शेतकरी बंधू-भगीनींच्या कामाप्रती, त्यांच्या श्रमास अभिवादन आणि सन्मान करण्याच्या दृष्टीने त्यांचा सेवेचा यथोचित गौरव व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय किसान दिवसाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि त्यांची सहयोगी संस्था राजयोग एज्युकेशन आणि रिसर्च फाऊंडेशनच्या ग्रामविकास प्रभागातर्फे येथील स्थानिक सेवाकेंद्रात शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला.
कागल स्थानिक परिसरातील शेतकरी ( farmer ) बांधवांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकरी साताप्पा माळी, सुभाष काळे, प्रकाश माळी, जगन पाटील, यानी प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान प्रंसगी आपले सेंद्रिय व योगीक शेती विषयक मनोगत व्यक्त केले. ब्र. कु. प्रियंका बहेनजी यांनी कार्यक्रमाचा आणि ग्रामविकास प्रभागाचा उद्देश सांगितला. ब्रह्माकुमारीज् तर्फे जगाच्या पोशींद्याचा यथोचित कार्यगौरव होणे हा एक भाग्याचा क्षण आहे अशी भावना व्यासपिठावरील मान्यवरांनी व्यक्त केली. हा सत्कार आनंदभाई, राजश्री बहेनजी, सुभाषभाई आदींच्या शुभहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी राजेश्री बहेनजी दिदींनी ग्रामविकास प्रभागातर्फे आयोजित उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली त्यात शाश्वत योगिक शेती, ग्राम दत्तक योजना, आदर्श ग्राम योजना, निसर्ग आणि मानव मैत्री आदिंचा समावेश होता. कार्यक्रमास शंकर पाटील,शामराव फराकटे, राजु कवडे,दिनकर नाईक, आनंदा पाटील, रमेश पाटील, अरुण पाटील, रूपाली पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगीनी बहेनजी यांनी केले. तर आभार प्रियंका बहेनजी यांनी मानले.