बातमी

मुगळी येथे ३० हजाराची चोरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुगळी ता . कागल येथिल संजय सुबराव पाटील आणि किरण किसन मोरे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडुन तसेच लोखंडी तिजोरीचा दरवाजा तोडून व लाकडी तिजोरी उघडून बारा हजारांचे दागिने, रोख रक्कमेसह एकूण ३०,०००रु चा ऐवज अज्ञात चोरटयानीं लंपास केला.

या चोरीचा प्रकार ९ जुलै ते २२ ऑगस्ट २०२३ च्या दरम्यान घडला. घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. याबाबतची फिर्याद संजय सुबराव पाटील यानीं मुरगूड पोलिसात दिली आहे. अधिक तपास हे ङ कॉ शिंदे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *