कागल : कागल तहसील कार्यालय हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असून, रेकॉर्ड ऑफिस मध्ये जुने उतारे,7/12 उतारे, टेनन्सी केसीस, जन्मनोंदी, जुने सर्वच रेकॉर्ड, तसेच कोर्ट कचेरी कामी लागणारी बरीच कागदपत्रे लागतात, यासाठी तहसीलदार मॅडम यांनी अर्ज दाखल केल्यानंतर किमान आठ दिवसामध्ये अर्ज निकाली काढणे बंधनकारक केलेले आहे, परंतु रेकॉर्ड कार्यालयातील असणारे उमेदवार हे आपल्या मनानुसार लोकांना तारीख पे तारीख देऊन, ज्यांचा आर्थिक व्यवहार चांगला आहे त्यालाच दुजोरा मिळत असून वारंवार कारणे घेऊन लोकांना घरी परतावे लागत आहे, रेकॉर्ड कार्यालय एक महिना स्थलंतरामध्ये गेला त्यानंतर उमेदवारांना अधिकाऱ्यांनी संबंधित सूचना करूनही संबंधित उमेदवार हे त्यांच्या सूचना धाब्यावर बसवत आहेत तरी संबंधित उमेदवारावर योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे अशी मागणी लोकांकडून होत आहे.
एक नागरिकांची शोकांतिका…
प्रत्येक उमेदवाराला विभाग दिलेले आहेत, परवाच एका पक्षकाराला अत्यंत गडबडीने 7/12 उतारे गरजेचे होती, संबंधित पक्षकार अधिकाऱ्यांना भेटला त्यांनी अडचण बघून देऊ अशी भूमिका घेऊन एका उमेदवाराला फोन करून अर्जनुसार कल्पना दिली, अधिकाऱ्यांना हा हा करत एका मगरूर उमेदवाराने ज्याच्याकडे अर्ज ने आण करणे, रजिस्टर नोंद करून घेणे अशा उमेदवाराने टपालच नेले नाही, आम्ही दोन दिवसानी टपाल नेतो, अधिकारी अशीच सांगतात तुम्ही दोन दिवसानी या मग विचार करू अशी भूमिका घेतली त्यामुळे संबंधित पक्षकाराला परत जावे लागले.
वेळेत काम न करणारे उमेदवार हवेत कशाला..
उमेदवार काम करणारे असले की, लोकांची काम लवकर होतात, कामाची जाण आहे म्हणून उमेदवाराकडून काम होईल या आशेने लोक येतात पण कामचं न करणारे आणि तारीख पे तारीख देणारे, मनमानी फी घेतात अधिकाऱयांना गाफिल ठेवून स्वतःच रेकॉर्ड चालवत आहेत असे समजणारे उमेदवार हवेतच कशाला असा सवाल लोकांकडून होत आहे.