बातमी

मुरगूडच्या राजर्षी शाहू पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करत असलेली व स्वर्गीय खास. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या कृपाआशिर्वादाने आणि मा. खास. संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी राजर्षी शाहू नागरी सह. पतसंस्था मर्या. मुरगूड या संस्थेची सन २०२२ ते २०२७ या कालावधीकरीता निवडणूक बिनविरोध झाली. निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री. अमर शिंदे होते.

नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे –
सर्वसाधारण गट – मा. विरेंद्र सं. मंडलिक, मा. दत्तात्रय तु. सोनाळकर, मा. नेताजी य. पाटील, प्रदिप कृ. चव्हाण, मा. नारायण ग़. मुसळे, मा. रविंद्र ग. ढेरे,
अनुसुचित जाती जमाती -मा. रामचंद्र अ. भोपळे, इतर मागास- मा. पांडूरंग कृ. भाट, भटक्या व विमुक्त्त जाती – मा. दत्तात्रय चं. भोई, माहिला प्रतिनिधी – सौ. वैशाली सं. मंडलिक, सौ.सविता ता. कळांद्रे.

राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करणेसाठी प्रामुख्याने मा . नामदेवराव मेंडके , मा .बाजीराव गोधडे , किरण गवाणकर , मारुती रावण , प्रा . संभाजी आंगज, सुनिल मंडलिक , बाजीराव खराडे ,यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *