मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात अनेक भागामध्ये अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झालेली पहावयास मिळत आहेत .काही ठिकाणे अतिक्रमणाच्या विळख्यानी ग्रासली आहेत .त्यामूळे वाहतुकीला मोठा अडथळा येत असून मुरगुड नगरपालिकेने आज पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावरील चार दुकाने हटवून आज कारवाई केली. मुरगुड पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्ता हा मुरगुडच्या मुख्य बाजारपेठेशी जोडणाराच असून या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते तसेच शाळा – महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांची या ठिकाणी ये -जा सुरू असते या सर्वच वाहतुकीला या अतिक्रमणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती.
त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यासमोरील मुरगूड विद्यालय समोर चार दुकानांची खोकी रस्त्यावरील अतिक्रमण निर्मुलनाखाली हटविली. ही कारवाई पूर्वी पालिकेने संबधितांना नोटीसा लागू केल्या होत्या पण दाद न मिळाल्याने पालिकेच्या एका खास पथकाने जेसीबीच्या सहाय्याने खोकी हटविली. यामध्ये एक बेकरी ‘ एक गिफ्ट हाऊस व एक टेलरिंग व्यवसायिक यांची दुकान खोकी अतिक्रमणाअंतर्गत हटविली. या कारवाईत पालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
नगरपालिकेच्या या धडक कारवाईचे नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे .
Keep up the good work.