बातमी

मुरगूडच्या लिटील मास्टर गुरुकुलचे शैक्षणिक कार्य आदर्शवत – वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी

लिटल मास्टर गुरुकूलम मुरगूडचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मुरगुड ( शशी दरेकर ) : लिटील मास्टर गुरुकुलम् मुरगूड या संस्थेचे शैक्षणिक कार्य आदर्शवत व-संस्कारक्षम विद्यार्थी घडवणारे असून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू बनवणारे आहे असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सूर्यवंशी यांनी केले. ते लिटील मास्टर गुरुकुलम् संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

येथील कुरणी रोडवरील दत्तप्रसाद सांस्कृतिक हॉल मध्ये लिटिल मास्टर गुरुकुलम या शैक्षणिक संस्थेच्या विधार्थी – विद्यार्थीनींचा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांचा सत्कार गुरुकुलमचे संस्थापक अध्यक्ष मा. सुभाष अणावकर यांच्या हस्ते तर व आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ सुनीता आनंदराव पाटील यांचा सत्कार गुरुकुलच्या व्यवस्थापिका सौ सुमन अणावकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी महाराष्ट्रातील सर्वांत सर्वात उंच कळसुबाई शिखर सर केले बद्दल १ वर्षे ८ महिने वयाच्या चि . साम्राज्य इंद्रजीत मराठे या चिमुकल्या गिर्यारोहकाचा वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी यांचे हस्ते सत्कार करणेत आला. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा शिवप्रसाद बोरगावे,सौ अश्विनी अणावकर ,डॉ . माळवदे , सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ .वंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्वागत प्रास्ताविक सुभाष अणावकर यांनी तर आभार सौ सुमन अणावकर यांनी मानले. भव्य रंगमंच ,विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि वाद्यसंगीताच्या साथीने सुरु असणाऱ्या चिमुकल्यांच्या कला सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते . श्रोत्यांचा चेहर्‍यावर कौतुका बरोबर आश्चर्याचे भाव विलसत होते.

स्टेजवर थिरकणाऱ्या चिमुकल्यांच्या इवल्याशा पाऊलांनी श्रोत्यांना ठेका धरायला लावला होता .सौ सिंधुताई कोंडेकर व सौ सरिता रणवरे यांच्या गोड आवाजातील निवेदनाने तर कार्यक्रमास अधिकच रंगत येऊन गेली .संगीत शिक्षक सुरेश सुतार यांची तबला साथ आणि आसावरी टिपुगडे यांची कोरिओग्राफी यामुळे कार्यक्रम खूप उठावदार झाला होता . ज्युनि. केजी ते चौथीपर्यंतच्या चिमुकल्यांच्या पाच – साडेपाच तास चाललेल्या या विविध कलागुण दर्शनाच्या कार्यक्रमामध्ये इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले बाप्पा मोरया या गीतावरील नृत्य, ज्युनि. केजी च्या चिमुरड्यांचा पोलीस डान्स ,प्ले अँड नर्सरीच्या चिमुकल्यांचा किलबिल किलबिल पक्षी बोलती या गाण्यावरील डान्स , सिनी . केजीच्या मृणाली टिपुगडेचा आय एम् बार्बी गर्ल , पहिलीच्या रसिका हुल्लेचे ओ कृष्णा है गाण्यावरील नृत्य, सिनी . केजीच्या बाल चमूने सादर केलेला चक धूम धूम,आय लव माय इंडिया , नगडा नगडा बजा , छान किती दिसते फुलपाखरू अशी पंढरी पंढरी, छोगाडा तारा टिपरीगीत ग्रुप डान्स ने श्रोत्यांना ठेका धरून नाचायला लावले . तर १ लीच्या माहेश्वरी किल्लेदार तिच्या दही दूध लोणी आणि सिनियर केजीच्या जुई दरेकर हिच्या चला जेजुरीला जाऊ या लावणी नृत्याने सर्वांनाच अचंबित करून सोडले व टाळ्यांच्या गजरात वाहवा मिळविली.

नृत्य,गीत गायन यासह नाटीका सादरीकरण असे ४९घटकांचे सादरीकरण हजारच्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती आणि दिर्घकाळ चाललेला हा सांस्कृतिक विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम मनात भरून घेवूनच श्रोते घरी परतले
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वर्षा पाटील, ज्योती डवरी, अपर्णा माने, संचली साळोखे, धनश्री कांबळे, रश्मी सावंत, अश्विनी शिंदे , वैशाली पाटील , सत्यजित मराठे , धोंडूबाई कांबळे, रूपाली बोंडगे या अध्यापिका व कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.

रंगमंचावर चिमुकल्यांचा नाच आणि त्यांना रंगमंचा समोरून प्रोत्साहनपर मार्गदर्शन करतांना त्यांच्या माता पालकांचा हाव भावासह सुरु असणारा नृत्याविष्कार श्रोत्यांचे मनोरंजन करून गेला . तर श्रोत्यांचा मध्ये उपस्थित असणाऱ्या चिमुकल्यांच्या उस्फुर्त नृत्याविष्कार श्रोत्यांना आकर्षित करीत होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *