मुरगूड (शशी दरेकर) : बोरवडे’ ( ता. कागल ) येथे १८ जुलै २०२२ रोजी आनंदा गोपाळ जाधव यांच्या घरी झालेल्या चोरीचा छडा मुरगूड पोलीसांनी लावून सोन्याचे दागिने व रोकड असा ९० हजार चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघा चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसानां यशआले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली आधिक माहिती अशी : बोरवडे येथील आनंदा गोपाळ जाधव हे १८ जुलै रोजी बाहेरगावी गेले होते त्यामूळे त्यांचा दरवाजा कुलूपबंद होता .याचा फायदा घेत शेजारीच राहाणाऱ्या हर्षद मारुती जाधव याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावरुन आनंदा जाधव यांच्या घरात प्रवेश करीत १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लप्पा ‘ १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स व वेल तसेच पाच हजारची रोकड असा९० हजार ऐवजाची चोरी केली होती.
त्याच्या घरातून आनंदा जाधव यांच्या घरात जाण्यासाठी मार्ग होता .त्यामूळे पोलिसाना हर्षद जाधव याच्याविषयी संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने या चोरीची कबुली देत चोरीचा माल त्याने आपले मित्र सौरभ सुभाष कुराडे व सतिश विठ्ठल बचाटे ( रा. सोनाळी ) यांच्याकडे दिल्याचे सांगितले . त्यानंतर पोलीसांनी सौरभ कुराडे व सतीश कुराडे यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून तिघा चोरटयांना जेरबंद करण्यात मुरगूड पोलिसांना यश आले.
या प्रकरणी मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथक प्रमुख प्रशांत गोजारे ‘ पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील व पोलीस मधुकर शिंदे यांनी या गुन्हयाचा छडा लावला .