बातमी

प्रसाद पाटील यांच्या वाढदिवासानिमित्य पुस्तके भेट कार्यक्रम उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : पुरोगामी वाचन चळवळ कोल्हापूर यांच्या वतीने साहित्यीक मा .जी. के . पाटील तथा गोविंद पाटील ( सर ) यांच्या संयोजनातून पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याअध्यक्ष प्रसाद पाटील ( सर ) यांच्या वाढदिवसानिमित्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोनवडे येथिल ” अभिनव करियर अॅकेडमीमध्ये पुस्तके भेट कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक मा. एन्. डी. पाटील तथा राजन कोनवडेकर हे होते. या कार्यक्रमासाठी मा .डी. व्ही . कुंभार , संस्थापक अध्यक्ष योगेश पाटील (सर) डॉ . आनंद (सर) व पुरोगामी वाचन चळवळीचे सदस्य, शिक्षकवृंद व विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर पुस्तके भेट कार्यक्रमासाठी स्पर्धा परिक्षा, थोर विचारवंत यांची १०१ पुस्तके अॅकेडमीस भेट देण्यात आली. या कार्यक्रमासाठी मा .जी. के . पाटील ( सर ) यानीं प्रस्ताविक तर अंकिता कांबळे यानीं सूत्रसंचलन केले . शेवटी सुदीप कांबळे यानीं आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *