बातमी

ऑगस्ट महिना हा सणवार, उत्सवाने भरलेला; यंदा २२ शुभ

सण-उत्सवाच्या श्रावणात यंदा २२ शुभ, उत्तम दिवसांचा योग

सणासुदीचे दिवस – ऑगस्टमध्ये वास्तुशांतीसाठी सहा दिवसच मुहूर्त

व्हनाळी(सागर लोहार) : भारतीय संस्कृतीमध्ये घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणतेही मंगल कार्य करावयाचे असल्यास शुभ तिथी पाहिली जाते. नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात नागपचंमी, पुत्रदा एकादशी, मोहरम, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपालकालासह अशा अनेक सणांची पर्वणी आहे. या महिन्यात सुमारे २२ दिवस शुभ दिवस आल्याने त्या दिवशी विविध पूजाविधी करणे शुभ असल्याचे ज्योतिष तज्ञ सौ. नलिनी जगताप (हातकणंगले) यांनी सांगितले.
नव्या घरात गृहप्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती,सत्यनारायण पुजा केली जाते. यासाठी ऑगस्ट महिन्यात ३, ४, १०, १३, १७, २२ या तारखेला वास्तुशांतीसाठी शुभ मुहूर्त आहेत. परंतु सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत या कार्यासाठी शुभ मुहूर्त नाहीत. त्यामुळे दोन महिने वास्तुशांतीसाठी शुभ दिवसच नाहीच यानंतर नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात विविध तारखांवर वास्तुशांती करता येऊ शकेल असे ज्योतिष तज्ञ सागंतात.

या शुभदिनी तुम्ही करू शकता पूजा, मंगलकार्य
ऑगस्ट महिन्यात –
१ तारखेला (शुभ दिवस), ३ तारीख (उत्तम दिवस),
५ तारीख (प्रतिकूल दिवस), ७ तारीख (शुभ दिवस)
८ तारीख (अनिष्ट दिवस), ९ तारीख (शुभ दिवस),
१० तारीख (उत्तम दिवस), ११ तारीख (शुभ दिवस),
१२ तारीख (क्षय दिन), १४ तारीख (शुभ दिवस),
१५ तारीख (आनंदी दिवस), १६ तारीख (शुभ दिवस),
१७ तारीख (उत्तम दिवस), १८ तारीख (शुभ दिवस),
२० तारीख (शुभ दिवस), २१ तारीख (शुभ दिवस),
२३ तारीख (शुभ दिवस), २४ (अनिष्ट दिवस),
२५ तारीख (वर्ज्य दिवस), २६ तारीख (वर्ज्य दिवस),
२८ तारीख (शुभ दिवस), ३० तारीख (उत्तम दिवस)
चौकट – नागपंचमीने सुरुवात, पोळ्याने होणार श्रावणाचा समारोप
असे एकूणच ११ शुभ दिवस, ४ उत्तम दिवस आलेले आहेत.

१५-संकष्टी चतुर्थी
१६ -पारशी नूतन वर्ष प्रारंभ
११ -रक्षाबंधन
१९ – गोपाळ-काला
२६ – पोळा
१८ – श्रीकृष्ण जयंती
९ – मोहरम
२ – नागपंचमी

२८ जुलैपासून भाद्रपद महिना सुरू होता. यात ३० तारखेला हरितालिका तृतीया, ३१ तारखेला गणेशोत्सवला सुरुवात होणारआहे. अशा प्रकारे ऑगस्ट महिना हा सणवार, उत्सवाने भरलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *