मुरगूड ( शशी दरेकर ) : कऱ्हाड येथिल लिगाडे पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या नीट सेट परिक्षेत बोर्डात यश संपादन केलेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार नुकताच कऱ्हाड येथिल श्री .समर्थ मल्टीपर्पज हॉलमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दौलतवाडी ( ता. कागल ) येथील माजी सरपंच मा . श्री . श्रीकांतराव भोसले हे होते .
ते म्हणाले जिल्हयात , बोर्डात या ज्यूनियर कॉलेजने सातत्याने यश संपादन करून अग्रगण्य स्थान प्राप्त केले आहे . ही अभिमानाची गोष्ट आहे . त्यामुळे या कॉलेजचे अधिकाधिक विद्यार्थी शैक्षणिक संस्काराचा आनंद देत आहेत.
हा दैदीत्यमान सोहळा सुवर्णाक्षरात कोरुन ठेवण्यासारखा आहे. शिस्तप्रिय विद्यार्थी व शिक्षकवृदांचे त्यानीं यावेळी तोंडभरून कौतूक केले .लिगाडे पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विद्यानगर हे बाजीराव पाटील आणि विजय लिगाडे यानीं कठीण परस्थितीत सुरु केले . हे दोघेही बी .ई. मेकॅनिकल युनिव्हर्सिटीत टॉपर आहेत.
क्लास काढून कऱ्हाड इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण घेत व विद्यार्थ्यांचे प्रेम संपादन करत आणि फॉरेनच्या संधी सोडत या कॉलेजची त्यानीं स्थापना केली .आज या कॉलेजमध्ये १२००च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहितीही त्यानीं यावेळी सांगितली.
या गुणवंत गौरव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा . श्री . शरद गोसावी (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ), श्री. बाजीराव पाटील (अध्यक्ष), श्री . विजय लिगाडे ( उपाध्यक्ष ), प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.