कागल : स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे फौंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्या वतीने स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 व 21 वितरण कार्यक्रम दत्तप्रसाद हॉल मुरगूड येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे आईसाहेब शुभ हस्ते राजे समरजितसिंह घाटगे अध्यक्ष शाहू साखर कारखाना होते.
स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलताना राजे समरजित सिंह घाटगे म्हणाले मी सर्वप्रथम सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या एक-दोन वर्षांमध्ये कोरूना च्या काळात आपल्या तब्येतीची काळजी आपल्या नातेवाईकांची काळजी आपल्या घरातल्या मुलांची काळजी याचा विचार न करता सर्व शिक्षकांनी आपले कोरोना काळामधील कार्यालय फार चांगल्या पद्धतीने पूर्ण केले हे कार्य करीत असताना अनेक शिक्षकांनी आपले प्राण गमावले शासनाने जाहीर केल्याप्रमाणे कोविंड योद्ध्यांना 50 लाख रुपये द्यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे व आपली वचनपूर्ती करावीपुढे ते म्हणाले आम्ही आदर्श शिक्षक पुरस्कार देताना असा निर्णय घेतला की शिक्षकांची कृती व काम पाहून पुरस्कार द्यावयाचा कोणताही पक्ष किंवा गट न पाहता किंवा कोणत्याही मताची गोळा बेरीज करून नव्हे शिक्षकांची कृती व काम पाहून चांगले कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी रहाणे हे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे व छत्रपती शाहू महाराज यांच्या काळापासूनच सुरू आहे त्यांचाच वारसा आपण पुढे चालवत आहोत शिक्षकाकरिता स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे बँकेमार्फत लवकरच शिक्षक कर्ज योजना सुरू करण्याचा मानस आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व आभार रमेश कांबळे सर यांनी केले, कार्यक्रमास अनंत फर्नांडिस अध्यक्ष शाहू कृषी खरेदी विक्री संघ कागल डॉ. किरण लोहार शिक्षण अधिकारी एम पी पाटील स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे बँक कागल कागल विधानसभा मतदार संघातील सर्व शिक्षक शिक्षिका पदाधिकारी अनेक संस्थांचे संचालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.