कृषी बातमी

किमान आधारभुत किंमत खरेदी योजना

भरडधान्यासाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीस 7 जानेवारीपर्यंत  मुदतवाढ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीचे काम पाहते. हंगाम 2022-23 करीता शासनाचे एफ.ए.क्यू. प्रतीच्या धान (भात) करीता 2 हजार 40 व रागी (नाचणी) 3 हजार 578 प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. आजपर्यंत काही कारणास्तव जे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करु शकले नाहीत त्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी 7 जानेवारी 2023 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी सी.डी.खाडे यांनी दिली.

[ays_poll id=”4″]

            ज्या शेतकऱ्यांना या धान/नाचणी खरेदी केंद्रावर धान/नाचणी विक्री करायची आहे. अशा शेतकऱ्यांनी प्रथम या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणी करीता शेतकऱ्यांनी चालू हंगाम 2022-23 मधील धान (भात), नाचणी पिक लागवडीची ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे.

 शेतकरी नोंदणीची मुदत 7 जानेवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी त्वरीत या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा व नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, शाहू मार्केट यार्ड येथे संपर्क करावा, असेही श्री. खाडे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *