कागल : कागल तालुका मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण 13 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला. त्यापैकी पाच ठिकाणी बीजेपी ची सत्ता आलेली आहे. सहा ठिकाणी मुश्रीफ गट व तीन ठिकाणी मंडलीक व संजय घाटगे गटाचे चार सरपंचपदासाठी उमेदवारांनी बाजी मारलेले आहे.
कागल तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचा कल हा समिश्न असून यामध्ये भाजपचे बाचनी, रणदेवीवाडी, बामणी, निढोरी, अर्जूनवाडा, करड्याळ येथे सरपंच निवडून आले आहेत, मुश्रीफ गटाचे चिमगाव, नद्याळ, फराकटेवाडी, जैन्याळ, मुगळी, पिराचीवाडी, बोळावीवाडी, , बाळेघोळ, सेनापती कापशी तर हमीदवाडा, कसबा सांगाव, हणबरवाडी येथे मंडलिक गटाचे सरपंच आहेत. प्रवीण पाटील गट ठाणेवाडी, संजयबाबा घाटगे गटाचे बेलेवाडी काळमा, हसुर बुद्रक हे सरपंच आहेत.