बातमी

जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला शिवसेना पक्ष : संजयबाबा घाटगे

केनवडे येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ, पहिल्याच दिवशी 500 सदस्य नोंदणी

व्हनाळी (सागर लोहार) : जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मकच आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धर्तीवर शिवसेनेचे समाजकार्य अखंडपणे सुरू आहे. ठाकरे कुटूंबियांमुळेच मुंबई सुरक्षित असून जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला पक्ष म्हणजे शिवसेनाच होय. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून ठाकरे कुटूंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी कार्यकर्त्याना केले.

केनवडे ता.कागल येथे अन्नपुर्णा शुगर कारखाना कार्यस्थावर शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अन्नपुर्णा कारखाना कार्यस्थळावर संजयबाबा घाटगे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनापक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे आदेशाने व शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे,संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख अशोकराव पाटील,शिवगोंड पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सदस्य नोदंणीचा शुभारंभ माजी आमदार संजयबबा घाटगे यांचे हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी सदस्य नोंदणीत 500 सदस्यांची नोंदणी करण्यात आली.

कार्यक्रमास निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे, ए.वाय.पाटील, के.के.पाटील, भैरू कोराणे, महेश देशपांडे, अशोक पाटील, काकासो सावडकर, युवराज कोईगडे, विष्णूआण्णा गायकवाड, बाजीराव पाटील, धोंडिराम एकशिंगे आदी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *