बातमी

मुरगूड येथे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्य चित्रकला स्पर्धा उत्साहात

स्पर्धेत १७३९ विद्यार्थ्यांचा सहभाग

मुरगूड(शशी दरेकर) : शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगूड केंद्रात घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत १७३९ विद्यार्थ्यांनी आपले भावविश्व कागदावर रेखाटले. मुरगुड येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये या स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन शाहु साखर कारखाना संचालिका सौ.रेखाताई पाटील यांच्या हस्ते झाले. शाहू महाराज पुतळा पूजन व स्व. राजेसाहेब यांच्या प्रतिमेचे आणि सरस्वतीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.

स्वागत व प्रास्ताविक शाहू कारखान्याचे ऊस विकास अधिकारी के. बी.पाटील यांनी केले . याप्रसंगी कोजीमाशी संचालकपदी विजयी झालेबद्दल अविनाश चौगुले यांचा अनंत फर्नांडिस यांचे हस्ते तर प्राथमिक शिक्षक स्विकृत संचालकपदी निवड झालेबद्दल सुनील सोनगेकर यांचा दत्तामामा खराडे यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले, शाहू कारखान्याच्या माध्यमातून स्व. विक्रमसिंह घाटगेंनी राज्याला सहकारात आदर्श देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शिस्तीच्या पालनाची आजही समाजाला नितांत गरज आहे. त्यांनी सहकारात असो अथवा राजकारणात आपली तत्त्व सोडले नाही.

उपप्राचार्य एस.पी.पाटील म्हणाले, स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे हे सहकार कृषी, कला, क्रीडा सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात अभ्यासू व जाणते नेतृत्व होते. मुलांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा. या उद्देशाने सुरू केलेल्या या चित्रकला स्पर्धेस वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावेळी सुनीलराज सूर्यवंशी ,दत्तामामा खराडे, प्रताप पाटील यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमासाठी नामदेवराव मेंडके, शाहु कृषी चेअरमन अनंत फर्नांडिस, भाजपा तालुका अध्यक्ष संजय पाटील, अरुण शिंत्रे, विलास गुरव, रामभाऊ खराडे, समरजित खराडे, सुहास मोरे, प्रवीण चौगुले, हिंदुराव किल्लेदार, छोटु चौगुले, सुनील कांबळे, अशोक फराकटे , अनिल अर्जुने, संतोष गुजर, सचिन गुरव,आदी उपस्थीत होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विष्णू जत्राटे, के .बी.पाटील, रॉबर्ट फर्नांडिस, सुधाकर जाधव, अरुण कांबळे, प्रमोद खराडे, विष्णू मोरबाळे, जयवंत पाटील, दत्ता जालीमसर, संभाजी गोधडे ,अविनाश भराडे, उदय पाटील, चंद्रकांत आंगज, आप्पासाहेब रेपे यासह शाहू ग्रुप चे पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अनिल पाटील तर आभार सुशांत मांगोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *