सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : सिध्दनेर्ली गावाचे सुपुत्र व सिद्धगिरी हॉस्पिटलच्या आर्थोपेडिक डिपार्टमेंटचे डॉक्टर तनिष पाटील यांनी नुकतीच पुणे येथून आर्थोप्लास्टी ची फेलोशिप प्राप्त केली आहे. डॉ. तनिष पाटील हे MBBS, M.S. Surgen असून त्यांनी २०१९ मध्ये हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथून आर्थोस्कोपी फेलोशीपही घेतली आहे .पाटील यांना मिळलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाटील यांना मिळालेल्या या फेलोशिप मुळे सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये आता आर्थोस्कोपी आणि आर्थोप्लास्टी आणखी प्रगत होणार आहे.स्सिद्धगिरी हॉस्पिटलच्या सिटी स्कॅन, अत्याधुनिक नव्याने दाखल झालेले सिमेन्स सेंप्रा १.५ टेस्ला हे एम आर आय मशीन, मॉड्युलर ओपरेशन थिएटर, कुशल अनेस्थेसिस्ट, प्रशिक्षित स्टाफ या वैशिष्ट्यांसोबत आता डॉक्टर तनिष पाटील यांच्या प्रगत आर्थ्रोस्कोपी तंत्रामुळे कोल्हापूर तसेच पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांची आरोग्यसेवा देता येणार आहे.
याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धगिरी हॉस्पीटलचे मेडिकल डायरेक्टर व प्रख्यात निरो सर्जन डॉक्टर शिवशंकर मरजके, मेडिकल सुप्रीटेंडन्ट डॉ.प्रकाश भरमगौडर यांनी केले आहे.