केंबळी येथे शिवध्यान मंदिराचे भूमीपूजन
व्हनाळी(सागर लोहार) : सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मनुष्य धकाधकीचे जीवन जगत आहे. या जीवनात आत्मिक समाधान हवे असेल परमार्था शिवाय तरणोपाय नसल्याचे प्रतिपादन कागल ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका राजश्री बहेनजी यांनी केले. केंबळी ,(ता. कागल) येथील बाळासाहेब कातकर शेतीफार्मवर शिव परमात्मा ध्यान कक्षाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
राजश्री बहेनजी म्हणाल्या मानवी जीवन सजीवातील सर्वात मोठी पुण्यातून लाभलेला जन्म आहे त्याचे सार्थक पाहिजे असेल तर सतसंग,सदाचार व परमात्मा सेवा हीच शास्वत व जीवनाची कल्याणकारी असल्याचे सांगीतले.
या वेळी कल्याणकारी परमात्मा शिव ध्यान मंदिराचे भूमीपूजन राजेश्री बहेनजी यांच्या हस्ते करण्यात आले.
ध्वजारोहण सुभाष भाई,एन.एस. पाटील यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास सुभाष भाई, अविनाश भाई, एकनाथ पाटील ,नामदेव कुंभार ,मारुती भाई ,नंदा पाटील, अरुणा पाटील ,अर्पणा पाटील, प्रियंका बहनेजी, राजश्री बहेनजी, योगिनी बहेनजी, रोहिणी पाटील, सुनिता जाधव, शांता घोरपडे आदी उपस्थित होते.
स्वागत बाचणी ब्रह्मकुमारी सेंटरच्या संचालिका अनिता बहिणी आणि केले तर आभार बाळासाहेब काटकर यांनी मानले.