मुरगूड (शशी दरेकर) : श्रीक्षेत्र आदमापुर येथील सद्गुरू बाळूमामा हे जागृत देवस्थान असल्यामुळे सध्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आहेत.आपण ही त्यांचे भक्त आहोत.देवालय समितीला जे सहकार्य हवे आहे ते आम्ही करु असे मत गोवा राज्याचे समाज कल्याण, नदी जलवाहतूक,पुरातत्व साधन संवर्धन मंत्री नाम.सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
नाम.देसाई यांनी आदमापूर येथे सपत्नीक भेट देऊन बाळु मामाचे आशीर्वाद घेतला. बाळूमामा देवालय समितीच्या वतीने नामदार देसाई यांचा कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या बाळुमामाचा विजय ग्रंथ व आशीर्वादाचा नारळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले प्रमुख उपस्थित होते.
स्वागत संजय कणसे यांनी केले.प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील गोकुळचे माजी संचालक. दिनकरराव कांबळे, सरपंच विजय गुरव, सरपंच राजनंदिनी भोसले, यशवंतराव पाटील बाळूमामा देवालय समितीचे सर्व सदस्य बकरी संगोपन समिती सदस्य व उत्सव कमिटी सदस उपस्थित होते.आभार प्रा.एस.पी.पाटील यांनी मानले.