कागल : श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसनिमित्त खर्डेकर चौक कागल येथे शांतिदूत मर्दानी आखाडा यांच्यामाध्यमातून मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी ग्रामविकास मंत्री आम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारे प्रशिक्षक महेश कांबळे व प्रशिक्षिका सौ नीलम महेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल येथील शांतीदूत मर्दानी आखाडा त्यांच्यावतीने उरूसानिमित्त मर्दानी खेळाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी लिंबू छाटणी, नारळ फोडणे, आगीची काठी, तलवारबाजी, फरी गदगा, केळ कापणी, काठी युद्ध, स्ट्रेचिंग काठी, सूर्यगोल, चार तोंडी, शिवमुद्रा, समोरासमोर फेटा, पायाखालून पट्टा, जंगली बाणा, काठीपट्टा, खापरी फोडणे आधी प्रकारचे मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. आमदार मुश्रीफ यांनी या मर्दानी खेळाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ केला व ते मर्दानी खेळ पाहण्यासाठी शेवटपर्यंत उपस्थित होते. या मर्दानी खेळात लहान मुलींनी आकर्षक कामगिरी केली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, पी. बी. घाटगे, प्रवीण काळबर, संजय चितारी, अमर सनगर, हिंदुराव पाटील, सुनील माने, सुनील माळी, नामदेव पाटील आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.