बातमी

सर्वसामान्यांचा विश्वास हेच आयुष्याचे सार्थक : संजयबाबा घाटगे

केनवडे अन्नपुर्णा च्या सभासदांना सभासदकार्ड, व जॅगरी पावडरचे वाटप

व्हनाळी (सागर लोहार) : माझ्या राजकिय जीवनात मला जरी कोण्यात्याही फार मोठ्या सत्ता मिळाल्या नसल्या तरी सर्वसामान्यांचा मिळालेला विश्वास हि फार मोठी शिदोरी आमच्याकडे आहे. त्या जोरावरच मी आजपर्यंत सार्वजनिक जिवणात तरलो आहे. या सर्वसामान्यांच्या भक्कम पाठबळावर अन्नपुर्णा कारखान्याची उभरणी करता आली. याचा माला सार्थ अभिमान आहे. हा सामान्यांचा विश्वास मी नेहमी जपणार असून ह्या विश्वासाला कधीही तडा न जावू देता कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन अन्नपुर्णा चे संस्थापक चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.

केनवडे ता. कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स कारखान्याच्या सभासदांना शेअर्स कार्ड वाटप व सवलीच्या दरात जॅगरी पावडर च्या वाटप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे प्रमुख उपस्थीत होते.

घाटगे पुढे म्हणाले, ज्या सभासदांनी आमच्यावर विश्वास ठाकला त्यांना सवलतीच्या दरातील गुळ पावडर मिळणे क्रमप्राप्त आहे. मी चेअरमन असलो तरी या सभासदांच्या कारखान्याचा विश्वस्थ आहे. सभासदांचे हित जोपसणे हे अद्य कर्तव्य आम्ही मानतो. आम्ही अनेक संस्था उभा केल्या त्या सर्व संस्थांचा मी संस्थापक,चेअरमन आहे. आयत्या पिठावर रांगोळ्या कडणा-यांसारखा मी संस्थापक,चेअरमन झालेलो नाही. इतर संस्थेप्रमाणेच अन्नपुर्णा शुगरला चांगले दिवस येथील असा अशावादही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सुरूवातीला ज्या सभासदांनी पहिले पाच शेर्अस घेतले अशा सभासदांना प्रातीनिधिक स्वरूपात शेअर्स कार्ड व सवलतीच्या दरातील जॅगरी पावडरचे वाटप संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे,अंबरिषसिंह घाटगे.सर्व संचालकांच्या उपस्थीत करण्यात आले.

यापेक्षा सामान्यांचे भले करावे…
संजयबाबा घाटगे म्हणाले, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून धाडी टाकून नामवंत व्यक्तींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचविणे असले उद्योग करण्यापेक्षा सरकारने सरकारी कार्यालयात तळापासून वर पर्यंत बोकाळलेला भ्रष्टाचार थांबवावा आणि सामान्यांना दिलासा द्यावा. ह्या यंत्रणेचा वापर जनकल्यांनासाठी कसा करता येईल याचा विचारही त्यांनी करावा.

अंबरिषसिंह घाटगे म्हणाले,कारखान्याचे अधिकारी कर्मचा-यांच्या प्रामाणिक कष्ट आणि सातत्याच्या जोरावर यंदा कारखना सुस्थीतीत चालू आहे. पहिल्या टप्यात 6 हजार 400 शेअर्सधारक सभासदांना सवलतीत जॅगरी पावडर देत असून पुढील वर्षापासून सर्व सभासदांना लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संचालक शिवसिंग घाटगे,दत्तोपंत वालवलकर,तानाजी पाटील,के.के.पाटील,विश्वास दिंडोर्ले,धनाजी गोधडे,एम.बी.पाटील, दिनकर पाटील,सुभाष करंजे,आनंदा साठे,कृष्णात कदम, शेअर्स विभागाचे अमोल पाटील,दिग्वीजय पाटील उपस्थीत होते. स्वागत सुभाष पाटील यांनी केले आभार धनराज घाटगे यांनी मानले.
फोटो ओळी : केनवडे येथे अन्नपुर्णा शुगर च्या सभासदांना शेअर्स सभासद कार्ड चे वाटप करताना चेअरमन संजयबाबा घाटगे,अंबरिषसिंह घाटगे, धनाजी गोधडे,विश्वास दिंडोर्ले आदी संचालक छाया : रघुनाथ पाटील,गोरंबे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *