कागल/ विक्रांत कोरे : सर्व्हर डाऊन ,वेळ संपली यामुळे अग्निपथ योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरणाऱ्या तरुणांचा अखेर भ्रमनिराश झाला. पुन्हा तारीख व वेळ वाढवून द्यावी अशी मागणी तरुणांच्याकडून केली जात आहे.
दिवसेंदिवस नोकरीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. तरुण वर्ग नोकरीच्या शोधात भरकडतो आहे. नोकरी नसल्याने छोकरीचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी केंद्र शासनाने अग्निपथ योजनेअंतर्गत हवाई दलात भरती करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याचे जाहीर केले. पाच जुलै 2022 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
गेली दोन दिवसां पासून तरुण वर्ग कागदपत्रांची फाईल घेऊन नेट कॅफेत गर्दी करून नम्रत बसले होते शेवटच्या दोन दिवसात सर्वर डाऊन असल्याने नीट कॅफेकडे हेलपाटे मारून तरुण वर्ग त्रस्त झाला शेवटच्या दिवशी म्हणजे पाच जुलै रोजी अक्षय लागली होती पण दिवसभरात एकच फॉर्म भरण्याची एका नेटके मालकांनी सांगितले. सर्व्हर डाऊन आणि वेळही संपल्याने तरुणांचा भ्रम निराश झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच गायब झाले. फॉर्म भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी तरुण वर्गातून केली जात आहे.