मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त औचित्य साधून मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी मुक्त संवाद साधला. संघाचे संचालक जयवंतराव हावळ यांनी स्वागत केले. संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन राव गंगापुरे यांनी संघाच्या कार्याची सविस्तर माहिती देऊन विरंगुळा केंद्र हे मुरगूड मधील ज्येष्ठांचे हक्काचे विश्रांतीस्थान झाले आहे. विरंगुळा केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने रोज ज्येष्ठांची उठबस असते. ज्येष्ठांच्या सहकार्यामुळे संघाच्या कार्यास उत्तम गती आलेली आहे. असे स्पष्ट केले .
पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सर्व ज्येष्ठांना त्यांचे आयुष्य सुखी, आनंदी, आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या . आणि आपल्या सेवेतील अनेक बऱ्यावाईट प्रसंगाची माहिती दिली. उपस्थित ज्येष्ठा कडून त्यांचे प्रश्न ,अडचणी जाणून घेतल्या. या अडचणी कोणत्याही पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिले . संघाचे प्रगतीपथावरील कार्य पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी पोलिस नाईक स्वप्नील मोरे उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक रणजीत सासणे यांनी सर्वांचे आभार मानले.
…..