कागल(प्रतिनिधी): कागलमध्ये सरलादेवी माने हायस्कूलमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत फुले, शालेय साहित्य, सॅनिटायझर, मास्क, चॉकलेट देऊन स्वागत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच कोरोना महामारी अजून पूर्णता संपलेली नाही, दक्षता घेण्याचे आवाहन केले. यावेळी दि कागल एज्युकेशन संस्थेचे सचिव व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, मुख्याध्यापिका सौ. नंदाताई माने, सुनील माने, बिपिन माने आदींची उपस्थिती होते. तब्बल दोन वर्षांनंतर शाळेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहिला.