बातमी

डॉल्बी मुक्त, शांततेत गणेशोत्सव साजरा करा – उपनिरीक्षक रविकांत गच्चे

कागल / प्रतिनिधी – शांततेत व डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करा .असे आवाहन कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी केले आहे.

गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचा आनंदाचा उत्सव आहे .संपूर्ण महाराष्ट्रभर गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .पण गेल्या काही दिवसात गणेश उत्सव मध्ये अनेक हिडीस व नको ते प्रकार घडत आहेत .डॉल्बी लावून मोठ्या प्रमाणात डान्स केला जातो . डॉल्बीच्या मोठ्या आवाजाने सामान्य नागरिक व दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. म्हणून कोल्हापूर पोलिसांनी डॉल्बी मुक्त गणेश उत्सव हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशननी. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव हे अभियान राबवावे. असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी केलेले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी कागल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांनी सहकार्य करावे.कागल पोलीस स्टेशनच्या वतीने .पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉल्बी मुक्त गणेशोत्सव .यासाठी मंडळांच्या मध्ये जनजागृती करण्याचे काम चालू आहे.

कागल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये कागल पोलीस जाऊन. मंडळांना डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करावा .असे आवाहन करीत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून कागलचे पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी .प्रत्येक गावामध्ये जाऊन डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करावा .सर्व मंडळांनी रीतसर परवाना घ्यावा. वाहतुकीस अडथळा येईल अशा ठिकाणी. कोणत्याही मंडळांनी आपले मंडप घालू नयेत. स्पीकर चा आवाज ठराविक लिमिटमध्ये लावून .रात्री दहा वाजता स्पीकर बंद करावेत.

या गणेशोत्सव मध्ये सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. असे आव्हान कागल पोलिसांच्या कडून करण्यात येत आहे. यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे म्हणाले. यावेळी तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *