कागल : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला आहे, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये केडीसीसी बँकेच्यावतीने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, केडीसीसी बँकेने निव्वळ शेतीसाठी कर्जपुरवठा करणारी बँक, ही जुनी ओळख कधीच पुसली आहे. सर्वच प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यामध्ये बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसायाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अण्णासाहेब पाटील योजनेमधून प्रकरणे सुरू आहेत. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना आर्थिक स्थैर्य देवून व्यवसायाभिमुख करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सुरू आहे. मराठा समाजासह इतर मागासवर्ग समाजासाठीही उद्योग, व्यवसाय व रोजगारवाढीच्या दृष्टीने तरुणांनी केडीसीसी बँकेच्या विविध योजनांचा लाभ असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, मधुकर नाईक, संतराम पाटील, राहुल पाटील आदी प्रमुख उपस्थित होते
अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज मंजूर झालेल्याची नावे अशी….. दीपक काशीद – बेलवळे बुद्रुक, कृष्णात पाटील – व्हन्नाळी, महावीर कावरे – वाळवे खुर्द, संगीता गोते – ठाणेवाडी, राहुल देवडकर – बानगे, शुभम बोंगार्डे – बानगे, मधुकर पाटील – कौलगे, नामदेव नाईक – कासारी, सुरेश सावंत – मळगे बुद्रुक, दिपाली जाधव – दौलतवाडी, अमोल हिरूगडे -सावर्डे बुद्रुक.