बातमी

‘माती वाचवा’ अभियानासाठी फ्रान्सच्या महिलेची सायकलवरून जनजागृती

कागल शहरात त्यांचे स्वागत करून सत्कार संपन्न

कागल : नतालिया…वय वर्षे 50 ही महिला फ्रान्स ते भारत तेही सायकलवरून ‘माती वाचवा’ अभियानासाठी (save soil.org ) बाहेर पडली आहे. फ्रान्सपासून इराण व पाकिस्तान देश वगळून सायकलवरून प्रवास करीत कागल नगरीत रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी आली होती.

कागल नगरीत त्यांना फेटा बांधून शाल, हार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जहांगीर शेख, तानाजी पाटील, भास्कर चंदनशिवे, सम्राट सणगर, अथणे काका, सुनिल तेली, प्रमोद कदम, पंकज खलीफ उपस्थित होते.

वनमित्र संस्थेच्या वतीने विजय इंगवले यांनी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सुरू केलेल्या सेव्ह सॉईल…. जमीन वाचवा अभियानाबद्दल माहिती दिली.

काही महिन्यापूर्वी सद्गुरूनी फ्रान्स ते कावेरी नदीच्या उगमापर्यंत दुचाकीवरुन रॅली काढली होती. त्याची प्रेरणा घेऊन नतालिया या महिलेने सायकलवरून पर्यावरण व सेव्ह सॉईल वाचविण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *