सिद्धनेर्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सिद्धनेर्ली तालुका कागल येथील ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये चालू वर्षी सार्वजनिक गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे काटेकोर पालन करत चालू वर्षी गावातील सर्व गणेश मंडळानी सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही.
सिद्धनेर्लीमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र चालू वर्षी कोरोणच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच निर्णयाला अनुसरून गावामधील सर्वच तरुण मंडळानी याला साथ देत चालू वर्षी एकाही गणेश मंडळाने मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही.त्यामुळे गणेशोत्सव काळात असणारे जल्लोशी वातावरण यावर्षी मात्र कुठे दिसले नाही.
गावचे सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला होता.त्यांनी गावातील सर्व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना बोलावून कोरोणाचे गांभीर्य पटवून देत यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचे आवाहन केले होते.या निर्णयाल गावातील तरुण मंडळांनी एकमुखाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज सिद्धनेर्ली मध्ये गणेशोत्सवाच्या दिवशी पूर्ण शुकशुकाट दिसून येत होता.