महाराष्ट्र केसरी कै. प्रकाश चौगले व महाराष्ट्र चॅम्पियन कै. शहाजी अर्जुने यांच्या स्मरणार्थ चषक देण्यात येणार
मुरगूड (शशी दरेकर) : ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लाल आखाडा व्यायाम मंडळाच्या वतीने दि. २५ ते २७ नोव्हेंबर २०२२ अखेर विविध वजन गटातील राज्यस्तरीय ‘लाल आखाडा ” कैसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिली.
येथील लाल आखाडा व्यायाम मंडळाच्या वतीने सलग १८ वर्षे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा भरविल्या जात आहेत . यामध्ये विविध वजन गटातील लाल आखाडा चषक कुस्ती स्पर्धा होत आहे. ओपन ७५ ते ९७ किलो वजन गटातील कुस्ती स्पर्धा अंतर्गत प्रथम क्रमांक विजेत्या मल्लास रुपये १ लाख व चांदीची गदा देऊन ‘लाल आखाडा चषकाचा बहुमान दिला जाणार आहे. या गटातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीस रुपये ६१ हजार व ४१ हजार तर चतुर्थ क्रमांकास रुपये २१ हजार बक्षीस आहे.
वरिष्ठ गटांतर्गत ७४ किलोपर्यंतच्या वजनी गटात पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे रुपये २१ हजार, १५ हजार व ११ हजार रुपये व चषक बक्षीस आहे. ६५ किलो ६१ किलो व ५७ किलो वजन गटासाठी प्रथम क्रमांकास रुपये ११ हजार व चपक, द्वितीय व तृतीय क्रमांकासअनुक्रमे रुपये ९. व ७ हजारांचे बक्षीस आहे. कुमार गट १७ वर्षांखालील ५० किलो ४५ किलो व ४२ किलो अशा तीन वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकांपर्यंतच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये ५ हजार, ३ हजार व २ हजार व चषक बक्षिस आहे. कुमार गट १४ वर्षाखालील] ३५, ३० व २५ किलो वजन गटातील कुस्ती विजेत्यांना अनुक्रमे रुपये ३ हजार, २ हजार १ हजार व चषक अशी बक्षिसे आहेत.
या प्रसिद्ध कुस्ती आखाड्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय व राज्यस्तरावरील नामांकित मल्लांचा सहभाग राहणार आहे. कुस्ती शौकिनांसाठी खास प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेस संयोजक लाल आखाड्याचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मा. उपनगराध्यक्ष डॉ. अशोक खंडागळे यांनी स्वागत केले. तर माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर, यांनी प्रास्ताविक केले.
माजी उपनगराध्यक्ष, बजरंग सोनुले, दत्तात्रय जाधव, सदाशिव मेंडके, शिवाजी पाटील, पृथ्वीराज कदम,कुमार सावर्डेकर, धोंडिराम माडेकर, के.डी.मेंडके, रामचंद्र भूते, प्रकाश भोसले, बाजीराव जाधव, सचिन मगदूम, शंकर इंगवले, युवराज सूर्यवंशी, समाधान हावळ, सुरेश भिके, अनिल शिंदे, सुनील चव्हाण, आकाश हासबे, विश्वजित रामाणे, संकेत बारड, एकनाथ बरकाळे, बाजीराव चांदेकर, सुरज मसवेकर, मयूर गुजर आदी प्रमुख उपस्थित होते.
.