कागल : राष्ट्रीय महामार्ग कागल विस्तारीकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमलू श्रीवास्तव यांनी कागल येथे रस्ते विस्तारीकरणअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची व कागल शहरात प्रवेश करणारा रस्ता मोठा करण्याच्या कामाबद्दल पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे उपस्थित होते.
महामार्ग सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने शंभर वर्षांपूर्वीचा अरुंद असलेला रस्ता नव्याने करताना मोठा करावा व येथील उड्डाणपूल कराडच्या धर्तीवर पिलर उभारून करावी, अशी मागणी समरजीत घाटगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, रमेश माळी, बॉबी माने, राजू पाटील, जयवंत रावण, आसिफ मुल्ला, राजू जाधव आदी उपस्थित होते.