मुरगूड : ( शशी दरेकर )
मुरगूड शहरातील कांही प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण रखडले आहे . याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आज मुख्य बाजारपेठेतील सुरु असलेले रस्ता डांबरीकरण काम बंद पाडून आंदोलन केले.
गाव भागातील शक्ती सेना चौक ते जमादार चौक , महादेव गल्ली ‘ साळोखे गल्ली ;सावकारनगर ‘ मरगूबाई मंदीर ते तुकाराम चौक आदि रस्त्यांचे डांबरीकरण कित्येक महिन्यापासून रखडले आहे ते प्रथम पूर्ण करा अशी मागणी या आंदोलन कर्त्या नागरिकांनी लावून धरली .व मुख्य बाजारपेठेतील सुरू असलेले डांबरीकरणाचे काम बंद पाडले.
आंदोलन स्थळी प्रशासकिय अधिकारी येत नसल्याने नागरिक संतप्त झाले . अखेर मुख्याधिकाऱ्यांचे प्रतिनिधी पिंपळे मॅडम यांनी रखडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण १५ दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात तानाजी डोंगरे , विशाल इंदलकर , युवराज सुर्यवंशी, .दत्तात्रय मंडलिक , संग्राम हाळदकर ‘ अमोल रनवरे , पांडुरंग मगदूम ,तानाजी साळोखे ,श्रावण कळांद्रे , वैभव तोडकर . व गावभागातील नागरीकानी सहभाग घेतला.
रस्ता डांबरीकरणाची कामे लवकरच पूर्ण !
शहरातील सर्वच रस्त्यांची डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे . उपलब्ध निधीतून आयोजित सर्व कामे लवकरच पूर्ण केली जातील . इतर रस्त्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे . तो मिळताच मार्च अखेर शहरातील एकही रस्ता डांबरीकरणाशिवाय राहणार नाही .
—- हेमंत निकम ( मुख्याधिकारी ‘ मुरगूड नगर परिषद )