मुरगूडमध्ये ” पर्युषण पर्व ” सोहळा उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल श्री .जैन श्वेतांबर मंदीर येथे “पर्युषण पर्व ” सोहळा मोठया उत्साहाच्या वातावरणात पार पडला. श्री. वासुपूज्य भगवान मुळनायक मंदीराचा नुकताच जिर्णोद्धार पूर्ण झाला असून हे मंदीर मुरगूड व परिसरातील एक सुंदर, कलात्मक, नाविन्यपूर्ण काच मंदीर असे संबोधले जाते. हे मंदीर भाविकानी पहातानां नक्कीच डोळ्याचे … Read more

Advertisements

बळीराम रेपे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : राधानगरी तालूक्यातील विद्यामंदिर अवचितवाडी येथे श्री . बळीराम रेपे यांचा सेवानिवृत्ती निमित भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या भावपूर्ण सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपती नाना सावर्डेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित संभाजी पाटील होते. सुरूवातीला श्री बळीराम रेपे यांचा सेवानिवृत्ती बद्दल शाळा व्यवस्थापन समिती, … Read more

जयभारत कला क्रीडा मंडळ, आण्णा ग्रुप बाचणी अध्यक्षपदी भरत प्रकाश चौगुले मंडळाच्या वतीने गणेश उत्सवमध्ये सामाजिक उपक्रम

बाचणी – जयभारत कला क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष पदी भरत प्रकाश चौगले तर उपाध्यक्षपदी सतीश रंगराव चौगले असून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपणारे हे मंडळ असून यावर्षी गणेशउत्सवमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार केला जाईल. तसेच विधवा महिलांचे हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण विध्यार्थी चे सत्कार तसेच कोरोना काळा मध्ये चांगले कार्य करणारे डॉक्टर, सेविका, याचं सत्कार व … Read more

एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत केदार दाभोळेचे यश

मडिगले(जोतीराम पोवार): वाघापूर तालुका भुदरगड येथील वाघापूर हायस्कूल चा विद्यार्थी केदार सागर दाभोळे याने नुकत्याच झालेल्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत 115 गुण मिळवून यश संपादन केले. या यशासह तो महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेस पात्र ठरला असून त्याला विषय शिक्षक चंद्रकांत वड्ड यांच्या मार्गदर्शनासह मुख्याध्यापक डी पी पाटील, वाय.बी. शिंदे, व्ही व्ही कुराडे, ए. … Read more

आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिकेसंदर्भात बैठक

इचलकरंजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज इचलकरंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अशोकराव जांभळे व मदन कारंडे हे दोन्ही गट एकत्र येणार असून आगामी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकावण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या बैठकीत मार्गदर्शन करताना माननीय आमदार हसन मुश्रीफ म्हणाले की, श्री गणरायाच्या आगमनाने हे दोन्ही … Read more

मुरगूड नगरपरिषदेला महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवून देणार – खासदार प्रा. संजय मंडलिक

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड नगरपरिषदेला महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवून देणार. अशी ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली. मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , खाते अधिकारी आणि सेवकवृंद यांच्या वतीने नगर परिषदेचा १०१ व्या वर्धापन दिनाचा लोकोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित गुरुवार १ सप्टेबर पासून १६ सप्टेबर अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. … Read more

एसटी बसगाडयांच्या गैरसोयीबदल मुरगूडमध्ये विद्यार्थ्याचे आंदोलन

विद्यार्थांनी एसटीच्या अधिकाऱ्यानां धरले धारेवर मुरगूड ( शशी दरेकर ): विद्यार्थ्यांच्या एसटी बसगाड्यांच्या गैरसोयी संदर्भात आज मुरगूडमध्ये एस टी रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले. या आंदोलनामूळे चार तास एस टी. वाहतूक ठप्प होती. अखेर आंदोलक व विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत अधिकाऱ्यांनी एसटी बसगाड्यांच्या मागण्या मान्य करून संबधित मार्गावर … Read more

केडीसीसीमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ कर्ज वितरण

दहा लाख कर्ज मर्यादेची शून्य टक्के व्याजदराची योजना कोल्हापूर, दि. २९: केडीसीसी बँकेमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ योजनेचे कर्ज मंजुरीपत्र लाभार्थ्याला देण्यात आले. कागल येथील सागर शिवाजीराव गुरव यांना दूध व्यवसायासाठी पाच लाखाचे हे बिनव्याजी कर्जाचे मंजुरीपत्र देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार, … Read more

मुरगुडच्या अमृतमहोत्सवी विश्वनाथराव पाटील सहकारी बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

मुरगूड ( शशी दरेकर ) – “स्व. विश्वनाथराव पाटील यांच्या घालून दिलेल्या तात्विक बैठकीवर संस्था आर्थिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, ऊस उत्पादक, आणि लहान व्यावसायिक हा संस्थेचा मुख्य आधार आहे. त्यांच्या श्रमाच्या प्रत्येक रुपयाची संस्था विश्वस्त या नात्याने काळजी घेण्यास बांधील आहे. सभासद या संस्थेस आपली आई मानतो 75 वर्षानंतरही हीच … Read more

सहकार ही सामान्य माणसांची चळवळ : संजयबाबा घाटगे

व्हनाळी आंबाबाई विकास संस्थेमार्फत सभासदांना 12 टक्के डेव्हिडंट वाटप व्हनाळी(सागर लोहार) : सहकार ही सामान्य माणसांची चळवळ आहे. सहकारामध्ये अत्यंत शक्ती असून सामान्य शेतक-यांनी निर्माण केलेल्या या सहकार शक्तीचे रक्षण केले तर शेतक-यांचे कोटकल्याण करता येते हे या विकास सेवा संस्थांनी दाखवून दिले आहे. समाजाच्या कल्याणासाठी सहकारी संस्थाचं योगदान महत्वाचं असून, विश्वास हा त्यांचा महत्वाचा … Read more

error: Content is protected !!