सुळकूड योजनेविरोधात १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सुळकूड येथील बैठकीत निर्णय; हजारो शेतकरी सहभागी होणार सुळकूड : इचलकरंजी शहराच्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मंजूर झालेली १६०.८४ कोटींची पाणीपुरवठा योजना रद्द व्हावी, या मागणीसाठी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजता दूधगंगा बचाव कृती समितीमार्फत मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चात दूधगंगाकाठच्या सुळकूड, कसबा सांगाव, मौजे सांगाव, रणदिवेवाडी, लिंगनूर, … Read more

नियमित कर्जफेड करूनही प्रोत्सहानपर लाभापासून वंचीत

बाचणी परिसरातील शेतक-यांचे समरजितसिंह घाटगे यांना निवेदन व्हनाळी : सलग तीन वर्षे बॅंकेकडून घेतलेले पीक कर्ज नियमीत परतफेड केले असताना सुद्धा साके,व्हनाळी,केंबळी,बेलवळे, ता.कागल परिसरातील सुमारे 400 एवढ्या शेतक-यांना बॅंक आॅफ इंडिया च्या बाचणी शाखेतून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर 50 हजार रूपये कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. या शेतक-यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळेवर केली … Read more

निढोरीमध्ये नागरिकासाठी ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी साहित्यांची उपलब्धता

मुरगूड (शशी दरेकर): निढोरी ता. कागल येथे नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ग्रामपंचायतीने ओपन जिम, तर लहान मुलांना खेळणी साहित्याची उपलब्धता केल्याची माहीती सरपंच अमित पाटील यांनी दिली. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.दूरदर्शन ,मोबाईलच्या विळख्यात सापडलेल्या तरूणाईचे आरोग्य बिघडले आहे . याची दखल घेत निढोरी ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरिता गावामध्ये ओपन जिम … Read more

घरकुल – यशवंत किल्ला परिसर घेरलाय विविध समस्यांनी

कागल : येथील घरकुल ते यशवंत किल्ला परिसर विविध समस्यांनी घेरला असून या परिसरात भटकी कुत्री, गळक्या पाईपलाईन आणि जीर्ण अवस्थेतील धोकादायक विजेच्या डीपी मुळे नागरिक हैराण आहेत. घरकुल ते यशवंत किल्ला परिसर हा कागल आहे. शहरातील एक निवांत परिसर म्हणून ओळखला जातो. कागल मधील जयसिंग पार्क, गहिनीनाथ नगर, यशीला पार्क, आंबील कट्टी, शाहू साखर … Read more

कागलमध्ये आज ‘भारत जोडो’ पदयात्रा

कागल : काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या कागल तालुक्यात आज काँग्रेस नावालाच शिल्लक आहे. पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुरू आहे. त्या यात्रेला तालुक्यातून काँग्रेसचे किती कार्यकर्ते जाणार हा प्रश्न निर्माण झाला असताना भागातील शिवराज्य मंच आणि वनमित्र संघटनेने यात्रेस पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी सकाळी ९ वाजता शहरात पदयात्रेच्या समर्थन फेरीचे आयोजन केले … Read more

कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती ग्रंथाचे मुरगूडमध्ये प्रकाशन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. ए .जी .मगदूम’ यांच्या कागल तालुक्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती’ या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार प्रा.संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ.ए. जी. मगदूम ,महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. टी. एम .पाटील ,कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष, … Read more

कागलजवळ भरधाव कार उलटून इचलकरंजीची महिला जागीच ठार

कागल: भरधाव वेगात असलेली इर्टिगा कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजीतील महिला जागीच ठार झाली. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला चुकविताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रेखा मनोजकुमार केशरवाणी (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली. याबाबत माहिती अशी, इचलकरंजीतील पुजारी मळा … Read more

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय

सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक  कोल्हापूर, दि. 4 :- महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या.         महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय … Read more

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी करावी – प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी मानसी आमते

कोल्हापूर, दि. 3 : निवृत्तीवेतनधारकांनी बँकेतील हयातीच्या दाखल्यांच्या यादीतील नावासमोर स्वाक्षरी करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी मानसी आमते यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याबाबत निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेत नावासमोर स्वाक्षरी करावी. या यादीत आपले पॅन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी. निवृत्तीवतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांनी … Read more

रिपाइं ची मागणी मान्य, अंमलबजावणी कार्यवाहीचे लेखी पत्र दिलेने आमरण उपोषण मागे

कागल : साके येथे नवीन स्मशानशेड बांधकाम करावे, चिखली येथील रखडलेले स्मशानशेड बंधकाम पूर्ववत चालू करावे व कागल तालुक्यातील काही गावातील दलित समाजातील प्रेतांवर आजही उघड्यावर अंतिम संस्कार होतात याकरिता त्यांना मुख्य स्मशानभूमी खुली करावी अथवा त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मशानशेड व्यवस्था करावी या मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कागल तालुका वतीने तालुका नेते व … Read more

error: Content is protected !!