मुश्रीफ फाउंडेशन व ग्रामपंचायत सिद्धनेर्लीच्या वतीने आभाकार्ड कॅम्प

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : मुश्रीफ फाउंडेशन व ग्रामपंचायत सिद्धनेर्लीच्या वतीने येथील ग्रामपंचायत सभागृहा मध्ये आभाकार्ड काढण्याचा कॅम्प घेण्यात आला. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून आभा कार्ड काढून घेतले. डेंगू साथीचा प्रभाव फैलावू नये म्हणून त्यावरील प्रभावी उपाय योजनाची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी फारूक देसाई यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धनेर्लीच्या वैद्यकीय अधिकारी मंगला ऐनापुरे … Read more

Advertisements

आता इचलकरंजी पाणी योजना हटाव मोहीम फत्ते होईल – सागर कोंडेकर

कागल शहरामध्ये झाली बैठक कागल : इचलकरंजी पाणी योजना हाणून पाडण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कागल तालुक्यासह सीमाभागातील जनता हाटाला पेटली आहे. माञ, येथील नेतेमंडळींची भुमिका गुलदस्त्यातच होती. परंतु,जनरेटयामुळे येथील नेतेमंडळींनीही दुधगंगा बचाव कृती समितीच्या भुमिकेला साद दिली आहे. हा आपल्या एकजुटीचा पहिला विजयच आहे. नेतेमंडळींचे मिळालेले बळ आणि नागरिकांतून वाढत्या प्रतिसादाच्या जोरावर आता इचलकरंजी पाणी योजना … Read more

पिंपळगाव खुर्द येथील तरुणाने केली आत्महत्या

कागल /प्रतिनिधी : कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरी लाकडी तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. कृष्णात बाबुराव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे. त्याच्या पश्चात आई व वडील आहेत. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. कागल पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे .पुढील तपास पोलीस नाईक … Read more

वृक्षारोपण केल्यास माजी सैनिक समुहाला मिळणार बक्षीसे

कोल्हापूर, दि. 24 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून दिनांक 26 जुलै रोजी माजी सैनिकांनी वृक्षारोपण करावयाचे आहे. गावामध्ये 50 पेक्षा कमी व 50 पेक्षा जास्त माजी सैनिक समुहास अशा गावातील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे फोटो व त्याबाबतचा अहवाल सरपंचांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पाठवावा, … Read more

जिल्ह्यातील कोणकोणते रस्ते झाले बंद; अतिवृष्टीमुळे 28 मार्ग बंद

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा सदर माहिती दि. 24 जुलै सकाळी ९ वा. पर्यंत कोल्हापूर, दि. 24 : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 8 राज्यमार्ग व 20 जिल्हामार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्पाचे समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यमार्ग– करवीर- कोल्हापूर शहरा बाहेरील वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पासून शाहू नाका, कळंबे साळुंखे नगर, … Read more

वसुंधरा योजने अंतर्गत रणदेवीवाडी येथे वृक्षारोपण

गावात कायदा सुरक्षा राखण्याचे केले पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी आवाहन कागल (प्रतिनिधी) – कागल पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी रणदेवीवाडी या ठिकाणी गाव भेट दिली. गाव भेटी दरम्यान गावचे सरपंच राहुल खोत, उपसरपंच सुधाकर खोत व इतर सदस्य हजर होते. गाव भेटीदरम्यान गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत सूचना … Read more

मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी-नारायण सह. पतसंस्थेची वार्षिक सभा ६ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मी -नारायण सहकारी पतसंस्थेची ५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा ( फक्त सभासदा करीता )रविवार दि .६ ऑगष्ट २०२३ रोजी दुपारी ठीक २ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात भरविण्यात येणार आहे . सर्व सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे … Read more

मुरगूडात चित्रकला स्पर्धेत दोन हजार स्पर्धकांचा सहभाग

राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) – शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगूड केंद्रात भरवण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत 2000 विद्यार्थ्यांनी आपले भावविश्व कागदावर रेखाटले. येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये या स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन बिद्री कारखाना माजी व्हा.चेअरमन बाबासाहेब पाटील व शाहु कारखाना … Read more

error: Content is protected !!