बातमी

आणाभाऊ साठे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचा कार्यक्रम

कोल्हापूर जिल्हा परिषद व जागर फौंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचा कार्यक्रम

कोल्हापूर : आज दि. 1 ऑगस्ट 2023 इ. रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद व जागर फौंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहिर आणि समाजसुधारक श्री. आणाभाऊ साठे व शिक्षणतज्ञ, कोल्हापूर जिल्हयाचे पहिले खासदार बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंतीचे निमित्ताने आज कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या पुढाकराने आयोजीत केले होते.

पावसाळयाचे दिवस, वारंवार उद्भवणारे साथीचे आजार आणि डेंग्यू सदृष्य साथीमध्ये प्लेटलेटसचा भासणारा तुटवडा आणि रक्तपेढयांमधील असणारा अपुरा रक्तपुरवठा या अनुशंगाने वारंवार प्रसिध्द होणाऱ्या वृत्तपत्रामधील बातम्यांची दख्खल घेऊन जागर फौंडेशन कोल्हापूर व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूरने जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संतोष पाटील (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 ऑगस्ट 2024 इ. रोजी राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीमार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करणेत आले होते.

या रक्तदान शिबीराचे उदघाटन नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संतोष पाटील यांच्या हस्ते करणेत आले. जवळपास 150 जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता. वैद्यकीय तपासणीअंती एकुण 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले, यामध्ये आरोग्य विभागातर्गत आरोग्य व कु.क.प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर कडील व आरोग्य विभागातील एकुण 40, जिल्हा परिषदेचे इतर विभागातील 13 अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला, या रक्तदान शिबीराच्या अनुशंगाने मा. श्री. संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रक्तदान ही अशी बाब अशी आहे की ती तुटवडा झाला तर एका व्यतीने दुसऱ्या व्यक्तीस रक्तदान करुनच भरुन काढावी लागते. कृत्रीमरित्या रक्त बाजारात तयार करता येत नाही. त्यामुळे जिल्यातील सर्वच समाजसेवी संस्था, शासकीय व निमशासकीय संस्थानी रक्तदान शिबीरे आयोजन करुन जिल्हयात तुटवडा पडलेला रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.

कार्यक्रमास मा. संतोष पाटील, प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जागर फौंडेशनचे अध्यक्ष, प्रा. बी. जी. मांगले, खर्डेकर फौंडेशनचे अध्यक्ष श्री. विक्रमसिंह खर्डेकर, माजी आमदार अमल महाडिक, माजी जि.प.सदस्य बाबासाहेब देवकर, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प संचालक, सौ. सुषमा देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री. व्ही. टी. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. एस. डी. रणवीर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. माने, सामान्य प्रशासन विभागाच्या ऊप मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मनिषा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे ऊपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरुण जाधव माध्यमिक शिक्षणाधिकारी, श्री. आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सौ. मीना शेंडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. बाबर, व इतर सर्व खात्यांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *