कागल सीमा तपासणी नाक्यावर अनियमीत दंड व आर्थिक लूट

कागल / प्रतिनिधी : कागल येथील सीमा तपासणी नाक्यावर सुरक्षा रक्षकांकडून वाहनचालकांना अतिरिक्त वजनाची भीती दाखवून आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करून संबंधित सुरक्षा रक्षकाला तातडीने निलंबित करावे, अन्यथा सीमा तपासणी नाका बंद पाडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील यांनी नाका प्रशासनाला … Read more

वाढत्या ठेवी ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक : सौ. नवोदिता घाटगे

राजे  बँकेची १०९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संप्पन्न कागल (प्रतिनिधी): राजे बँकेच्या गत आर्थिक वर्षात चाळीस कोटीहून अधिक रकमेच्या ठेवी वाढल्या आहेत. बँकेकडे सातत्याने वाढत असलेल्या ठेवी ह्या बँकेवरील सभासद व ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्षा सौ नवोदिता घाटगे  यांनी केले. कागल येथील श्रीराम मंदिरमधील सभागृहात शतक महोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेची … Read more

गावागावात खेळांचे मैदान: क्रीडा विकासाचे दिशादर्शन

         कोल्हापूर : अद्ययावत क्रीडा संकुलाचा प्रस्ताव त्वरीत तयार करावा असे सांगून प्रत्येक गावात खेळांसाठी मैदान असावेत यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करावेत, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा … Read more

ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 1 ऑक्टोबरपासुन वाढ

कोल्हापूर : खटुआ समितीच्या शिफारशीनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील ऑटोरिक्षांसाठी 1 ऑक्टोबर पासून सुधारित रिक्षा भाडेदर वाढ (सर्व इंधन प्रकार) साठी मंजूर केली आहे. नवीन भाडेदरानुसार पहिल्या 1.1 कि.मी. साठी 27 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 24 रुपये भाडे आकारण्यात येईल. तसेच रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यत होणा-या भाडेदराच्या 50 टक्के अधिक … Read more

राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला अपघात !  चालक जखमी

कागल (प्रतिनिधी): पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील विराज जंक्शनजवळ मोटारसायकलवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान घडला. महादेव मारुती गायकवाड (वय – ५५, रा. मुधोळ, जि. बागलकोट) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन व पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, … Read more

राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ‘शाहू’स जाहीर

७३ व्या पुरस्काराने ‘शाहू’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कागल : राष्ट्रीय साखर महासंघ, नवी दिल्ली यांच्यातर्फे गळीत हंगाम २०२४-२५ साठी उच्च साखर उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास सहाव्यांदा जाहीर झाला आहे.कारखान्याला मिळालेला हा राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मिळून ७३ वा पुरस्कार आहे. राष्ट्रीय … Read more

पर्यावरणपूरक गणेशोत्सव काळाची गरज

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले. महाराष्ट्र शासनाने १४ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’म्हणून घोषीत केल्यामुळे या उत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. परंतू हा उत्सव साजरा करताना नागरिकांची सुरक्षितता, कायद्याचे पालन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी … Read more

अमृताच्या स्वप्नाला सतेज उर्फ बंटी पाटील यांचे बळ; जागतिक स्पर्धेसाठी ५० हजारांची मदत

मुरगूड (शशी दरेकर) : जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे स्वप्न घेऊन अमेरिकेला जाणाऱ्या मुरगुडच्या अमृता पुजारीच्या पाठीशी माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. त्यांनी अमृताला ५० हजार रुपयांची बक्षीस रक्कम देऊन तिच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेला शुभेच्छा दिल्या.     २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी अमृताची निवड झाल्याबद्दल दि. ६ सप्टेंबर रोजी बंटी … Read more

कागलमध्ये १० ऑक्टोबरला महसूल लोकअदालत

कोल्हापूर (जिमाका) : कागल तालुक्यातील पहिली त्रैमासिक महसूल लोकअदालत शनिवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील नागरिकांनी या लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन आपले अर्धन्यायिक महसुली दावे तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढावेत आणि महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान २०२६ चा लाभ घ्यावा, असे आवाहन कागलचे तहसिलदार अमरदिप वाकडे यांनी केले आहे. विधी … Read more

मुरगूडमध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील विठ्ठल मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे संत सेना महाराजांची पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अमोल रणवरे यांचे शुभहस्ते करण्यात आले.त्यानंतर ह भ प उपलाने महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.    यावेळी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील यांचे हस्ते महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात … Read more

error: Content is protected !!