कागल मध्ये गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कागल (प्रतिनिधी) : कागल बस स्थानकाजवळील गणेश मंदिर भक्त मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भेट वस्तू व देणगी कार्यक्रम करण्यात आले. या मंडळाने covid-19 च्या पार्श्वभूमीवर चालू वर्षी इतर कार्यक्रम स्थगित करण्यात आले होते. गतवर्षीही कोविड सेंटरला गणेश मंदिर भक्त मंडळाने रुपये दीड लाखाची औषधे प्रदान केली. होती .सामाजिक बांधिलकी … Read more

Advertisements

मडिलगे खुर्द येथे अक्षर सागर साहित्य मंचतर्फे पुरस्कार वितरण व सोहळा संपन्न

मडिलगे (जोतिराम पोवार ) : अक्षर सागर साहित्य मंच गारगोटी व अक्षर सागर साहित्य पुरस्कार शाश्वत विकास चळवळ मडिलगे खुर्द तालुका भुदरगड येथील साहित्य मंचच्या वतीने नुकतेच साहित्य पुरस्कार वितरण करण्यात आले अध्यक्षस्थानी तुकाराम पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहा. संचालक संपत गायकवाड व बिद्रीचे संचालक धोंडीराम मगदूम होते. यावेळी कबीर वराळे यांच्या बाल … Read more

लाखे नगरातील डोंबारी समाजाला आरसीसी घरे देऊ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

श्री रासाई देवी मंदिराचा मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहन व वास्तुशांती सोहळा उत्साहात गडहिंग्लज, दि. ६: गडहिंग्लज ता.गडहिंग्लज शहरातील लाखे नगरातील डोंबारी समाजाच्या खापरीच्या घरांच्या जागी आरसीसी घरे देऊ, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. डोंबारी वसाहतीने बांधलेल्या श्री रासाई देवी मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्यात मंत्री श्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दिवसभरात श्री रासाई … Read more

बस्तवडे गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागल : बस्तवडे, ता. कागल येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे संचालक प्रविणसिंहभोसले हे होते. पाहुण्या म्हणून शिवानी भोसले उपस्थित होत्या. श्री.मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले, बस्तवडे गावाच्या विकाससाठी नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या फंडातून निधी कमी पडू दिला जाणार नाही. नामदार मुश्रीफ साहेबांना गावोगावी विकासाच्या डोंगर उभा … Read more

मुरगूड मधील स्मशानभूमीचे निकृष्ट दर्जाचे काम पाडले बंद

मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील नगरपालिका हद्दीतील वाघापूर रस्त्यावरील दत्त मंदिर परिसर व स्मशान भूमीवरील विविध बांधकाम , सिमेंट काँक्रीट कंपाऊंड वॉलची कामे व सुशोभीकरणाची कामे बोगस ,दर्जाहीन चालू असल्याने नागरिकांनी बंद पाडली आहेत. स्मशान भुमीतील दर्जाहीन वॉल काँक्रीट बेस संपूर्ण काढून नव्याने न केल्यास हे काम आम्ही होऊ देणार नाही . अन्यथा … Read more

संजय मोरबाळे यांची महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळावर सचिवपदी फेर निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : बिद्री साखर कारखान्याच्या कामगार युनियनचे अध्यक्ष संजय ज्ञानदेव मोरबाळे ( मुरगूड ) यांची महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळावर सचिवपदी फेरनिवड झाली आहे . पुणे येथील महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळावर संजय मोरबाळे यांनी गेली पाच वर्ष सचिव पदावर काम केले आहे . तसेच जिल्हा साखर कामगार समन्वय … Read more

सानिका स्पोर्ट्स फाऊंडेशन चे समाजोपयोगी कार्य कौतुकास्पद -प्रा. एस. पी. पाटील

मुरगुड ( शशी दरेकर ) – सानिका स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या वतीने आज पर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत .समाज परिlवर्तनाच्या कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या या फाऊंडेशनने एसटीचे चालक आणि वाहक यांना दिलेला मदतीचा हात खरोखर कौतुकास्पद आहे, असे मत मुरगुड विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. एस .पी.पाटील यांनी केले. ते सानिका स्पोर्ट्स फौंडेशन मुरगूड … Read more

मुरगूडात अश्वारूढ शिवपुतळ्याचे जल्लोषात स्वागत, शिवसेनेची निवडणुकीतील वचनपूर्ती

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणात सुमारे ९० . लाख रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आणि चबुतऱ्यासह सुशोभिकरणाचे अंतिम टप्प्यात आहे . आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. भगव्या झेंड्यानी सजलेली बाजारपेठ, शिवछत्रपतींचा जागर आणि शिवसेनेच्या घोषणांनी शिवमय वातावरणात हा पुतळा चबुतऱ्यावर बसविण्यात … Read more

शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन संकल्पना राबविणार – राजे समरजितसिंह घाटगे

शिंदेवाडी येथे ड्रोन तंत्राद्वारे फवारणी प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मुरगुड( शशी दरेकर ) – सभासद, शेतकऱ्यांच्या हितासाठी शाहू साखर कारखान्न्यामार्फत नवनवीन संकल्पना राबविणार आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. शिंदेवाडी ता.कागल येथे शाहू साखर कारखान्यामार्फत विजय गोधडे यांच्या ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिकवेळी ते बोलत होते.या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद … Read more

स्थानिक युवकांना उद्योजक बनविण्याचे व्यासपीठ म्हणजे मेक इन कोल्हापूर – राजे समरजितसिंह घाटगे

मेक इन कोल्हापूर उपक्रमाचा शुभारंभ कागल(प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या मातीत छोट्या स्वरूपात व्यवसाय सुरू करून यशस्वी झालेल्या स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून, राजे बँकेच्या पुढाकारातून स्थानिक युवकांना उद्योजक बनविण्याचे व्यासपीठ म्हणजे मेक इन कोल्हापूर उपक्रम आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. येथे राजे बँकेच्या माध्यमातून साकारलेल्या मेक इन कोल्हापूर या उपक्रमाच्या शुभारंभवेळी ते बोलत … Read more

error: Content is protected !!